कोपरगाव तालुका
जमिनीचा बांध कोरण्यावरून हाणामारी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत शेतीचा बांध कोरण्यावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत फिर्यादी सुभाष सीताराम येवले (वय-५२) हे जखमी झाले असून या बाबत आरोपी शिवाजी सीताराम येवले,अमोल शिवाजी येवले,तेजस शिवाजी येवले आदी तिघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने ब्राम्हणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी सुभाष येवले व आरोपी शिवाजी येवले यांची शेजारी-शेजारी शेतजमीन आहे.सध्या खरीप पिके काढून त्या जागी रब्बी पिके उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.त्यातच शेतजमिनीचे काम सुरु असताना आज सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी व आरोपी यांच्यात शेताचा बांध करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला त्यातुंन हि हाणामारी झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी सुभाष येवले व आरोपी शिवाजी येवले यांची शेजारी-शेजारी शेतजमीन आहे.सध्या खरीप पिके काढून त्या जागी रब्बी पिके उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.त्यातच शेतजमिनीचे काम सुरु असताना आज सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी व आरोपी यांच्यात शेताचा बांध करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला त्यात फिर्यादीस आरोपी शिवाजी येवले हे फिर्यादी सुभाष येवले यांना म्हणाले की,”तू आमचा बांध का कोरतो “असे म्हणून आरोपी अमोल येवले यांनी फिर्यादी सुभाष येवले यांस डाव्या पायावर व पाठीवर मारहाण केली आहे.तर तिसरा आरोपी तेजस येवले याने फिर्यादीचे डाव्या हाताच्या काम्बीवर मारहाण करून त्या हाताचे हाडास तडा दिला आहे.व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४९८/२०२० भा.द.वि.कलम.३२६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी शिवाजी येवले, अमोल येवले, तेजस येवले आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहे.