कोपरगाव तालुका
लाचलुचपतच्या जाळ्यात शिर्डीतील पोलीस कर्मचारी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या भावाचे मृत्यूबाबत दाखल असलेल्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आपण केलेल्या खर्चापोटी आपल्या पाच हजार रुपये द्यावेत अशी मागणी करत ती रक्कम स्वीकारताना शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रवीण दिलीप अंधारे (वय-३३) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिसना निरीक्षक हरीश खेडकर यांनी रंगेहात पकडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.असे आवाहन हा विभाग वारंवार करत असला तरी मात्र सामान्य नागरिक मात्र या विभागाकडून जरा फटकुनच वागत असतो.मात्र एखाद्या प्रकरणात लोकसेवकानी जास्तीची अपेक्षा वाढली तर वैतागलेला नागरिक मात्र अखेरच्या क्षणी या जाचातून मुक्त होण्यासाठी या विभागाचा दरवाजा खटखटावतात.याचे दुर्मिळ उदाहरण नुकतेच जवळके (धोंडेवाडी) या ठिकाणी उघड झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग मानला जातो.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय असल्याचे मानले जाते.शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे.जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन हा विभाग वारंवार करतो.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल असा विश्वासही दिला जात असतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती,समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.असे आवाहन हा विभाग वारंवार करत असला तरी मात्र सामान्य नागरिक मात्र या विभागाकडून जरा फटकुनच वागत असतो.मात्र एखाद्या प्रकरणात मात्र लोकसेवकानी जास्तीची अपेक्षा वाढली तर वैतागलेला नागरिक मात्र अखेरच्या क्षणी या जाचातून मुक्त होण्यासाठी या विभागाचा दरवाजा खटखटावतात.याचे दुर्मिळ उदाहरण नुकतेच जवळके (धोंडेवाडी) या ठिकाणी उघड झाले आहे.एका इसमाच्या भावाचे निधन काही दिवसापूर्वी काही कारणावरून नुकतेच झाले आहे.या प्रकरणात पंचनामा करणे त्याचा अहवाल (चार्जशीट) न्यायालयात दाखल करणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात मात्र यात सामान्य माणूस बऱ्याच वेळा अज्ञानामुळे भरडला जाऊन त्याच्याकडून लोकसेवक लाचेची मागणी करून त्याना ती देण्यासाठी मजबूर करतात.असाच काहीसा प्रकार जवळके या ठिकाणी घडला असून या ठिकाणी संतप्त झालेल्या मयताच्या भावाने (वय-२९) लाच मागणाऱ्या तपासी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध थेट नगर येथील लाचलुचपत विभागाशी दि.०९ ऑक्टोबर रोजी संपर्क साधून यातून वाचविण्याचा मार्ग विचारला असताना या विभागाने त्यास मदत करून त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध सापळा लावून रुपये पाच हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी प्रवीण अंधारे यास पंचासमक्ष नुकतेच जेरबंद केले आहे.त्या बाबतीत रोख रक्कम जप्त केली आहे.
या बाबत नाशिक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरीश खेडकर,दीपक करांडे,आदींनी सहकार्य केले आहे.दरम्यान या घटनेने शिर्डी व परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेने लाच घेणाऱ्या लोकसेवकांना चाप बसण्यास मदत होणार आहे.लाच लुचपत विभागाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.