जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नजीक तरुणीची आत्महत्या

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुंबई-नागपूर या राज्यमार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी टाकून शिंगणापूर येथील रहिवाशी असलेल्या तरुणी कु.पूजा रमेश औताडे (वय-२६) या तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली असून कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

येवला येथे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली कु.पूजा औताडे हि दि.५ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता असल्याची खबर या मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हरवलेल्या नागरिकांच्या वहीत नोंदवली होती.त्या नंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला असता ती मिळून आली नाही.त्यामुळे त्या कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले होते.शहर पोलिसांनीही या मुलीचा शोध घेऊनही ती सापडत नव्हती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी सहकारी कारखान्याच्या संजीवनी कॉलेज समोर “डी” टाइप या बिल्डिंग मध्ये सहा क्रंमाकाच्या खोलीत रहिवाशी असलेल्या व येवला येथे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली कु.पूजा औताडे हि दि.५ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता असल्याची खबर या मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हरवलेल्या नागरिकांच्या वहीत नोंदवली होती.त्या नंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला असता ती मिळून आली नाही.त्यामुळे त्या कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले होते.शहर पोलिसांनीही या मुलीचा शोध घेऊनही ती सापडत नव्हती.मात्र आज सकाळी एक अज्ञात मुलीचे प्रेत संवत्सर या ठिकाणी गोदावरीच्या पुलाखाली मुंबई-नागपूर या ठिकाणी एका मोठ्या खडकाच्या ठिकाणी असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता व सदरचे प्रेत वर काढले असता ते गायब मुलगी कु.पूजा रमेश औताडे हिचे असल्याचे तिच्या नातेवाईकांनी ओळखले असल्याने या मुलीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.मात्र कोणत्या कारणाने तिने आपली जीवन यात्रा संपवली याचे कारण मात्र गुलदस्त्यात असल्याचे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.सदर मुलगी हि मूळ पोहेगाव येथील असल्याचे समजते.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तक क्रं.४५-२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close