कामगार जगत
कोपरगावातील..या बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर महाराष्ट्रात सहकारी बँकेत आघाडीवर असलेल्या कोपरगाव सहकारी पीपल्स बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना आगामी दिवाळी निमित्त वीस टक्के सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर केला असून या कर्मचाऱ्यांना २.५० लाखांचे कोविड विमा संरक्षण जाहीर केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अतुल काले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
संचालक मंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात येणाऱ्या दीपावली सणानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना नुकताच बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच लाखांचा विमा संरक्षण जाहीर करण्याचा हितकारक निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेऊन जाहीर केला असून त्याचा लाभ पंच्याहत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे-अतुल काले, अध्यक्ष कोपरगाव कॉ-ऑप.पीपल्स बँक.
कोपरगाव पीपल्स बँकेने या वर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सर्व प्रथम घेतला आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोनाचा परिणाम सर्वत्र दिसत असून उद्योग क्षेत्र व उत्पादक क्षेत्र हे मंदीतून जात आहे.सप्टेंबरच्या शेवटी सर्व उत्पादक क्षेत्र आता सावरत आहे.विकास आलेख आता कुठे वाढू लागला आहे.या पार्श्वभूमीवर हा निर्णय कौतुकास पात्र ठरत आहे.
कोपरगाव पीपल्स बँक हि उत्तर महाराष्ट्रात सहकारी बँकेत अग्रणी मानली जाते.या बँकेची नुकतीच संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली आहे.या बैठकीत संचालक मंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात येणाऱ्या दीपावली सणानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना नुकताच बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच लाखांचा विमा संरक्षण जाहीर करण्याचा हितकारक निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेऊन जाहीर केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अतुल काले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.त्यांच्या या निर्णयाबद्दल पीपल्स बँक कर्मचारी संचालक विरेश पैठणकर,अशोक पापडीवाल,महाव्यवस्थापक दीपक एकबोटे,जितेंद्र छाजेड,विठ्ठल रोठे आदींनी संचालक मंडळाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.याबँकेत एकूण अधिकारी व कर्मचारी संख्या ७५ आहे.तर राज्यात विविध ठिकाणी एकूण शाखा आठ आहेत.