कोपरगाव तालुका
कोपरगावातील “तो” मनोरा ठरतोय जीवघेणा !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या साईनगर भागात जेऊर पाटोदा रस्त्याच्या लगत असलेला एक आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीचा मनोरा सखल भागात असल्याने तो त्याचा पृष्ठ भाग पूर्ण पावसाच्या पाण्यात बुडाल्याने नजीकच्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष रविकिरण ढोबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.
साईनगर या उपनगरात सुमारे तेरा-चौदा वर्षांपूर्वी आयडिया कंपनीने या भागात जेऊर पाटोदा रस्त्यालगत एक मनोरा उभारला आहे.मात्र तो उभारताना तो जमिनीपासून काही फूट उंचावर घेणे आवश्यक असताना ती काळजी घेतलेली दिसत नाही.याखेरीज प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे ती घेतलेली नाही.परिणाम स्वरूप या भागात पाऊस जास्त झाला तर या भागातील काही फूट खोलीचे सर्व पाणी या मनोऱ्याच्या बुडाशी जमा होते व त्याचे सुमारे दोन ते तीन आर.क्षेत्र सर्व क्षेत्र पाण्याखाली येते.त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे-रविकिरण ढोबळे
कोपरगावात अनेक ठिकाणी विविध मोबाईल कंपन्यांनी आपले मनोरे नगरपरिषदेच्या परवानगी विना बांधल्याचे आरोप वारंवार होत आहे.अनेक नागरिकांनी या बाबत नगरपरिषदेच्या प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले अनेकांनी निवेदने दिली.मात्र कंपन्या नगरपरिषद प्रशासनाला दाद देताना दिसत नाही.अनेक ठिकाणी ओ.एफ.सी.केबल परस्पर टाकल्याची उदाहरणे आहेत.तर काही कंपन्या परस्पर रस्ते खोदताना नगरपरिषदेच्या रस्त्याचे नुकसान केल्याचे दिसून आले आहे.शहराच्या पश्चिमेस साधारण दोन की.मी असलेल्या साईनगर या उपनगरात सुमारे तेरा-चौदा वर्षांपूर्वी आयडिया कंपनीने या भागात जेऊर पाटोदा रस्त्यालगत एक मनोरा उभारला आहे.मात्र तो उभारताना तो जमिनीपासून काही फूट उंचावर घेणे आवश्यक असताना ती काळजी घेतलेली दिसत नाही.याखेरीज प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे ती घेतलेली नाही.परिणाम स्वरूप या भागात पाऊस जास्त झाला तर या भागातील काही फूट खोलीचे सर्व पाणी या मनोऱ्याच्या बुडाशी जमा होते व त्याचे सुमारे दोन ते तीन आर.क्षेत्र सर्व क्षेत्र पाण्याखाली येते.परिणामस्वरूप या ठिकाणी कम्पनीने विद्युत जनित्र बसवलेले आहे.त्यातून कायम विद्युत प्रवाह सुरु असतो त्यातून एखादी दुर्घटना होऊ शकते.या बाबत आपण नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अजून उपयोग झालेला नाही.त्यामुळे या भागातील नागरिकांना नजीकच्या रस्त्याने जीव मुठीत धरून वावरावे लागते.या ठिकाणीच नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा एक व्हॉल्व असून तोही या पावसाच्या पाण्यात बुडून जातो परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याचा अनास्था प्रसंग गुदरतो.त्यातून एखादी साथ पसरण्याचा धोका असल्याचेही ढोबळे यांचे म्हणणे आहे.या बाबत आपण नगर परिषदेस वारंवार अवगत केले आहे,व लवकरच काही दुर्घटना घडल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही रविकिरण ढोबळे यांनी शेवटी दिला आहे.