जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात महसूल कर्मचाऱ्यास धक्काबुक्की,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत गौण खनिज मुरूम जे.सी.बी.व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदा भरत असताना त्याला हटकले असताना व गौण खनिजांचा परवाना विचारला असता महसूल अधिकारी रवींद्र नारायण देशमुख व माहेगाव देशमुख येथील कामगार तलाठी संदीप रामलाल ठाकरे यांनी त्यानां सदरची वाहने तहसील कचेरीत आमच्या बरोबर घेऊन येण्यास सांगितले असता ट्रॅक्टर चालक व मालक यांनी त्यास नकार देऊन आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर पाठलागानंतरही घेऊन पळून गेले आहे.या प्रकरणी चालक बाळासाहेब जाधव,मालक राजमहमंद शेख व त्यांचा मुलगा निहाल शेख असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे गौण खनिज चोरांत खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाने वाळूसह मुरूम व तत्सम गौण खनिज बेकायदा उचलण्यास महसूल खात्याने बंदी आणलेली आहे.असे असताना माहेगाव देशमुख येथील ग्रामपंचायत हद्दीत एका ठिकाणी एक जे.सी.बी.व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम काढण्याचे व त्याची बेकायदा वाहतूक सूरु असल्याचे उपकारागृह अधिक्षक रवींद्र देशमुख व त्यांचे त्याच गावातील सहकारी कामगार तलाठी संदीप ठाकरे आदींना दिसून आले त्यांनी याबाबत त्यांना हटकले व परवान्याबाबत रितसर विचाराना केली असता हि घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाने वाळूसह मुरूम व तत्सम गौण खनिज बेकायदा उचलण्यास महसूल खात्याने बंदी आणलेली आहे.असे असताना माहेगाव देशमुख येथील ग्रामपंचायत हद्दीत एका ठिकाणी एक जे.सी.बी.व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम काढण्याचे व त्याची बेकायदा वाहतूक सूरु असल्याचे उपकारागृह अधिक्षक रवींद्र देशमुख व त्यांचे त्याच गावातील सहकारी कामगार तलाठी संदीप ठाकरे आदींना दिसून आले त्यांनी याबाबत त्यांना हटकले व परवान्याबाबत रितसर विचाराना केली असता त्यांनी असा परवाना आपण काढला नसल्याचे सांगितले”.महसूल कर्मचाऱ्यांनी या बाबत तहसीलदारांना हि घटना अवगत केली असता त्यांनी सदरची वहाने जप्त करण्याचे व कारवाई करण्याचे आदेश दिला असता महसूल अधिकारी देशमुख व संदीप ठाकरे यांनी सदरची तिन्ही वाहने कोपरगाव येथील तहसीलदार यांचे कार्यालयात जप्त एकूण घेण्याचे फार्मन काढले.दरम्यान ते एक जे.सी.बी.व एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली चालक हे सदरची वाहने घेऊन कोपरगावकडे निघाली मात्र आरोपी चालक बाळासाहेब उर्फ दशराथ जाधव याने सदरचा ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन पळून जाऊ लागला त्याचा या महसुली अधिकाऱ्यांनी पाठलाग केला असता कुंभारी रस्त्यावर गणेश मंदिराजवळ हे वाहन पकडले असता ट्रॅक्टरचा मालक आरोपी राजमहमंद शेख व त्याचा मुलगा निहाल शेख यांनी तेथे येऊन महसूल अधिकारी देशमुख यांना गचांडी धरून धक्का-बुक्की करून म्हणाले,”हा ट्रॅक्टर माझा असून माझ्या विरुद्ध कारवाई केली तर तुमच्या विरुद्ध मी माझ्या घरच्या कोणाला तरी खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगेल,”मी तुझ्याकडे पाहतो”,तू कशी नोकरी करतो”असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.या प्रकरणी फिर्यादी रवींद्र देशमुख यांनी ट्रॅक्टर चालक,मालक व त्याचा मुलगा अशा तिघांविरुद्ध महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व मुरुमाणे भरलेली ट्रॉली असे ०२ लाख रुपये किमतीचे तर अंदाजे एक ब्रास मुरूम ०१ हजार रुपये किमतीचा असा ०२ लाख ०१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close