कोपरगाव तालुका
कंगणाचे चित्रपट प्रसिद्ध करू नका-जिल्हा शिवसेना
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सिनेअभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईची तुलना हि पाकव्याप्त काश्मिरशी केल्याने राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याने कोपरगाव येथील सुदेश चित्रपट गृहाने प्रदर्शित करू नये अशी मागणी उत्तर जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी नुकतीच या सिनेमा गृहांच्या व्यवस्थापकांची बोलताना केली आहे.
देशद्रोही कंगना रानौत आपल्या मुंबई मध्ये येऊन हिंदी सिनेमा सृष्टीत सुपरस्टार बनली,स्वत:चे स्वप्न साकार केले आणि आता तिनेच आपल्या मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मिर बरोबर केली आहे तसेच शिवसैनिकांचे दैवत पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची हिम्मत केली व ह्याच विकृत,बाजारु,उन्मत्त बाईने महाराष्ट्र सरकारला “बाबर”च्या नावाने संबोधित करुन आपल्या महाराष्ट्राचा व मुंबई पोलिसांचा अवमान करण्याचे धाडस केले आहे-राजेंद्र झावरे
राजेंद्र झावरे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,देशद्रोही कंगना रानौत आपल्या मुंबई मध्ये येऊन हिंदी सिनेमा सृष्टीत सुपरस्टार बनली,स्वत:चे स्वप्न साकार केले आणि आता तिनेच आपल्या मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मिर बरोबर केली आहे तसेच शिवसैनिकांचे दैवत पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची हिम्मत केली व ह्याच विकृत,बाजारु,उन्मत्त बाईने महाराष्ट्र सरकारला “बाबर”च्या नावाने संबोधित करुन आपल्या महाराष्ट्राचा व मुंबई पोलिसांचा अवमान करण्याचे धाडस केले आहे.झाशीच्या राणीची भूमिका केल्यामुळे ती स्वत:ला महान झाशीची राणी समजायला लागली आहे. कुठे ती थोर वीरांगना झशीची राणी आणि कुठे ही वाटांगण कंगणा. असा आरोप त्यांनी केला आहे.स्त्री असो किंवा पुरुष महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.तरी आपणास आवाहन करण्यात येत आहे की,देशद्रोही कंगणा रानौतचे कुठल्याही प्रकारचे सिनेमे आपल्या सिनेमा गृहातमध्ये प्रदर्शित करु नये असे आवाहनहि राजेंद्र झावरे यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,माजी शहरप्रमुख भरत मोरे,अस्लम शेख,भैय्या तिवारी,नगरसेविका सपना मोरे,उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.