कोपरगाव तालुका
आशा सेविकांना न.पा.कडून २ हजारांचे मानधन !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत कोरोनाच्या साथीत मोठी जोखीम पत्करून नागरिकांच्या आरोग्य निरीक्षणात महत्वाची सेवा बजावणाऱ्या आशा सेविकांनाचे तुटपुंजे मानधन लक्षात घेऊन त्यानां चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह २ हजारांचे मानधन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्याचे आशा सेविकांनी स्वागत केले आहे.त्यामुळे आशा सेविकांना असे मानधन देणारी कोपरगाव पालिका हि राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची नुकतीच सर्व साधारण सभा दृकश्राव्य पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात नगरपरिषदेकडॆ या आशा सेविकांनी सभेपूर्वी नुकतीच मानधन वाढीची मागणी केली होती.त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी त्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले होते.त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे- अध्यक्ष विजय वहाडणे
करोनापासून ग्रामस्थांनी कसा बचाव करावा यासाठी जिल्ह्यामध्ये सुमारे हजारो आशा सेविका कार्यरत आहेत.आशा सेविकांसह या प्रबोधनाच्या कामी ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका आणि ९ हजार १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर व बेमुदत संपाचा इशारा दिल्यानंतर झालेल्या मानधन वाढीच्या निर्णयाने आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांना जुलै महिन्यात काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. आशा कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी संप केला होता.तरी हे मानधन अत्यंत तुटपुंजे म्हणजे दिवसाला केवळ ३३ रुपये आहे.या बाबत अनेक वेळा मागणी करूनही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.मात्र कोपरगाव नगरपरिषदेने त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना न्याय देण्याचा नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची नुकतीच सर्व साधारण सभा दृकश्राव्य पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात नगरपरिषदेकडॆ या आशा सेविकांनी सभेपूर्वी नुकतीच मानधन वाढीची मागणी केली होती.त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी त्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले होते.त्यानुसार हा निर्णय राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत जवळपास २० आशा सेविका कार्यरत असून त्याना या निर्णयाचा फायदा होणार आहे.सरकार केवळ त्याना प्रतिमहा एक हजार इतके तुटपुंजे मानधन देत आहे.तर आता आंदोलनानंतर एक हजार १४ व्या वित आयोगातून तर नगरपरिषद स्वनिधीतून १ हजार असे दोन हजार रुपये अतिरिक्त मानधन पालिका देणार आहे.नगरपरिषेदेच्या या उपक्रमाचे नागरिकांसह या आशा सेविकांनी स्वागत केले आहे.