कोपरगाव तालुका
सरकारने कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घ्यावा- काँग्रेस
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सध्याची शेतकरी बांधवांची अतिवृष्टी मूळे झालेली परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने निर्यात बंद केली आहे.तरी सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होत असून केंद्र सरकार ने या निर्णयाचा फेर विचार करून कांदा निर्यात बंद करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी कोपरगाव शहर काँग्रेसने नुकतीच तहसीलदार योगेश चंद्रे यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर सुल्तानी निर्णय लादला आहे.आधी शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीत सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी घोषणा करावयाची व दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीस बंधने आणावयाची अशी दुहेरी नीती केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादत आहे.त्यामुळे कोपरगाव शहर काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देऊन या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले आहे.
केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर सुल्तानी निर्णय लादला आहे.आधी शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीत सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी घोषणा करावयाची व दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीस बंधने आणावयाची अशी दुहेरी नीती केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादत आहे.त्यामुळे कोपरगाव शहर काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देऊन या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले आहे. शेतकरी बंधूंच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहोचवत असून सदर निर्णय केंद्र सरकारने मागे घेऊन पुनर्विचार करावा अशा मागणीचे निवेदन कोपरगाव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार योगेश चन्द्रे यांना दिले आहे.तसेच लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन कोपरगाव बाजार समिती येथे करून शेतकऱ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देऊ असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ काँग्रेस नेते अशोक खांबेकर,जिल्हा युवक काँग्रेसचे तुषार पोटे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,तालुका उपाध्यक्ष विजय जाधव,अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा सचिव राजुभाई पठाण,युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते व इतर पदाधिकारी सुरक्षित अंतर पाळून उपस्थित होते.