कोपरगाव तालुका
पोहेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषी विद्यालयाची कृषी कन्या कु.साक्षी राजाराम गोरे हि अंतिम वर्षात शिक्षण घेत असून तिने प्रत्यक्ष शेतात जाऊन पोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांना बीज उपचारा संबंधी आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन केले आहे.
या प्रसंगी तिने आधुनिक शेतीविषयीचे फायदे व पिकावर होणारा किडीचा प्रादुर्भाव असेच रोग प्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन केला आहे.यावेळी पोहेगाव येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र औताडे,नवनाथ औताडे,किरण औताडे,ज्ञानेश्वर औताडे,शिक्षक अण्णा मोकळं,सतीश बनसोडे,राजाराम गोरे राहुल औताडे, आदी शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.