कोपरगाव तालुका
..या मुळे कोपरगावातील डॉक्टर आता रस्त्यावर !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संजयनगर येथील एक रुग्ण व तालुक्यात करंजी येथे एक रुग्ण आढल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाला पुन्हा एकदा सुरेगावात एका रुग्णाने धक्का दिला आहे तरीही नागरिक आपल्या सवयी बदलास तयार दिसत नाही.तालुका प्रशासन,आरोग्य विभाग व पोलीस नागरिकांना कानी-कपाळी ओरडूनही काही नाठाळ नागरिक मुखपट्टी बांधण्यास तयार दिसत नाही,काही अद्यापही बेकायदा गुटखे खाऊन रस्त्यावर थुंकणारे आपला विधिदत्त अधिकार समजतात त्यातून अन्य नागरिकांना आपण किती धोक्यात टाकत आहे याची त्यांना जाणीव नसल्याने अखेर कोपरगावातील डॉक्टरच आता रस्त्यावर उतरून नागरिकांना मुखपट्या बांधण्याचे आवाहन करू लागले आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सरकारने वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३१ जुलै पर्यंत केली आहे.तरीही नागरीक शासन दिलेल्या सुचनाकडे दुर्लक्ष करताना दुर्दैवाने दिसत आहे.यावर पर्याय म्हणून कोपरगावातील डॉक्टर संदीप वाबळे यांनी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची व त्यात आपणच जर पुढाकार घेतला तर नागरिकांमध्ये वेगळा संदेश जाईल अशी चर्चा करून डॉ.अजय गर्जे यांचेकडे सल्ला मसलत केली डॉ.गर्जे यांनी ती उचलून धरली.त्याला अन्य डॉक्टर संदीप मुरूमकर,डॉ.रमेश सोनवणे,डॉ.अतिष काळे,डॉ.प्रफुल्ल कुडके,बंडू शिंदे आदींनी साथ दिली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७९४ ने वाढून ती ५ लाख ४९ हजार ९९१ इतकी झाली असून १६ हजार ५०४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ६४ हजार ६२६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०७ हजार ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३९९ वर जाऊन पोहचली आहे तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे,औरंगाबाद,मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव तालुक्यात २० जून रोजी दोन रुग्ण आढळले आहे.त्यानंतर सुरेगावात दोन दिवसांपूर्वी आणखी एक रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित नागरिकांचे श्राव तपासणीचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
स्वाभाविकपणे सरकारने वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३१ जुलै पर्यंत केली आहे.तरीही नागरीक शासन दिलेल्या सुचनाकडे दुर्लक्ष करताना दुर्दैवाने दिसत आहे.यावर पर्याय म्हणून कोपरगावातील डॉक्टर संदीप वाबळे यांनी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची व त्यात आपणच जर पुढाकार घेतला तर नागरिकांमध्ये वेगळा संदेश जाईल अशी चर्चा करून डॉ.अजय गर्जे यांचेकडे सल्ला मसलत केली डॉ.गर्जे यांनी ती उचलून धरली.त्याला अन्य डॉक्टर संदीप मुरूमकर,डॉ.रमेश सोनवणे,डॉ.अतिष काळे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ.आप्पासाहेब आदिक,डॉ.प्रफुल्ल कुडके,बंडू शिंदे आदींनी साथ दिली आहे.व काल पासून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.सकाळी आठ ते नऊ या वेळेत कोपरगावातील संभाजी चौकासह अन्य विविध चौकात स्वतः उभे राहून नागरिकांना आवाहन करून मुखपट्टी बांधण्याचे आवाहन करताना दिसत आहे.तंबाखू गुटखे खाऊ नका व कोरोनाचा प्रसार करू नका असे आवाहन करत आहे.त्यामुळे डॉक्टरांनी असा पायंडा प्रथमच पडला असल्याने नागरिकांत एकच औत्सुक्य निर्माण झाले आहे.डॉक्टर,प्राध्यापक,शिक्षक हे समाजाचे घटक आदर्श या व्याख्येत मोडत असल्याने त्यांचा समाज मनावर चांगला परिणाम घडत आहे.डॉक्टरांच्या या उपक्रमाचे आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,अनिल कटके आदींनी स्वागत केले आहे.