निघोज( प्रतिनिधी)- दुष्काळाची भयानकता विचारात घेवुन कुकडीतुन तातडीने पाणी सोडण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटबंधारे विभागाला दिल्याने नगर जिल्ह्यातील जनतेला थोडा फार दिलासा मिळाला आहे. आज सकाळी पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात पाणी सुरु झाले असुन येत्या दोन दिवसात कुकडीतुन पाणी सोडण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असताना भाजपा शिवसेनेचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पारनेर, श्रीगोंदा, जामखेड आदी तालुक्यातील सभामध्ये कुकडीच्या पाण्याबाबत अनेकांनी समस्या मांडली. पिण्यासाठी व जनावरांसाठी पाण्याची गरज लक्षात घेवुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डाँ.सुजय विखे, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभा उपसभापती विजय औटी व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नगर जिल्ह्यात कुकडीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन कुकडीच्या या पाण्याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यानी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करून आज कुकडीतुन पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले. येत्या दोन दिवसात हे पाणी नगरकरांसाठी सोडण्यात येईल.
कुकडी प्रकल्पात अवघे १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. येडगाव धरणाने तर तळ गाठला त्यामुळे कुकडीचा पाणी प्रश्न थेट राजकिय आखाड्यात आला. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये सोडले तर आम्ही जलसमाधी होऊ असा इशारा पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्यामुळे नगर जिल्ह्याला पाणी मिळणार कीनाही यावर असा प्रश्न उपस्थित झाला होता.मात्र आता यातुन मार्ग काढण्यात यश मिळाले आहे.यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये शनिवारी उशीरा सोडले तर पिंपळगाव जोगे आवर्तन पूर्ण होताच काही तासातच पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्याातून येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.
जाहिरात-9423439946