कोपरगाव तालुका
..त्या मुलींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत वसंतराव आव्हाड यांचे शेताजवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून या ठिकाणी भराव मोठ्या उंचीचा उभारला असतानाही त्या ठिकाणी या भरावला ओलांडून जाणाऱ्या विद्युत वाहक तारा मात्र महावितरण कंपनीने काढल्या नाहीत परिणामी त्या ठिकाणी दुचाकी शिकण्यास गेलेल्या अल्पवयीन मुली कु.धनश्री गणेश पालवे (वय-८) रा.भाबड वस्ती व कु.प्रतिज्ञा नितीन आव्हाड (वय-७) रा.कोपरगाव बेट या दोघी जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत नगर-मनमाड महामार्ग ओलांडण्यासाठी त्या ठिकाणी उंच पुलाचे नियोजित काम सुरु असल्याने मोठा भराव टाकण्यात आला आहे.दरम्यान या भरावावरून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा या कामाच्या आधीच गेलेल्या आहेत.त्या या कामाच्या आधी काढणे आवश्यक होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.तथापि या भरावामुळे या तारांची उंची आपसूकच कमी झाली आहे.त्या मुळे त्यांना सहजच मानवी स्पर्श होण्यासारख्या आहेत.मात्र त्याकडे समृद्धी महामार्ग ठेकेदाराने दुर्लक्ष झालेले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात सध्या अत्यंत धीम्या गतीने राज्यसरकारच्या समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे.जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत नगर-मनमाड महामार्ग ओलांडण्यासाठी त्या ठिकाणी उंच पुलाचे नियोजित काम सुरु असल्याने मोठा भराव टाकण्यात आला आहे.दरम्यान या भरावावरून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा या कामाच्या आधीच गेलेल्या आहेत.त्या या कामाच्या आधी काढणे आवश्यक होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.तथापि या भरावामुळे या तारांची उंची आपसूकच कमी झाली आहे.त्या मुळे त्यांना सहजच मानवी स्पर्श होण्यासारख्या आहेत.मात्र त्याकडे समृद्धी महामार्ग ठेकेदाराने दुर्लक्ष झालेले आहे.या ठिकाणी या मुली सांयकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी (स्कुटी) शिकत असताना त्यातील एका मुलीचा या विद्युत वाहक तारांना हात लागला त्यास ती चिकटली गेल्याने दुसरी तीला वाचावयास गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान या घटनेनंतर त्यांना नजीकच्या नागरिकांनी ताबडतोब उचलून कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकऱ्यानी त्यांना मृत घोषित केले आहे.या घटनेने जेऊर-कुंभारी परिसरात खळबळ उडाली आहे.या दोघींवर आज दुपारी दीडच्या सुमारास दोन ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.मयत प्रतिज्ञा आव्हाड हिचे वडील आठ वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.त्या कुटुंबावर हा दुसरा आघात झाला आहे.तिची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून कोरोना काळात तिचे कुटुंब श्री कृष्ण मंदिराजवळ फळफळावळ विकून आपला जीवन चरितार्थ चालवत होते.या घटनेने हे कुटुंब हादरले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांना या प्रकरणी मुलीचे चुलते रवी वामन पालवे यांनी खबर दिली आहे.पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात १८/२०२० द.प्र.स.क.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे.तर पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.