कोपरगाव तालुका
..या शहरात दक्षता समितीत नगराध्यक्षांचा पहारा !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आपल्या नागरिकांना कोरोना साथीपासून वाचविण्याचे काम पोलीस,आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांचे सुरु असून त्यात आता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनीही दक्षता समितीत सहभागी होऊन आपल्या समिधा टाकण्यास प्रारंभ केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
साईबाबा कॉर्नर याठिकाणी रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत थांबून कोपरगाव शहरात विनापरवाना कुणीही व्यक्ती किंवा वाहनांना प्रवेश करू दिला नाही.अशा अनेक व्यक्तींना व वाहनांना परत पाठविण्यात आले.अशाच प्रकारे टाकळी फाटा,टाकळी नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी थांबून स्वयंसेवक प्रशासनास सहकार्य करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत-नगराध्यक्षा वहाडणे
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७९३ हजारने वाढून ती ९६ हजार ४९२ इतकी झाली असून ३०४१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३३ हजार ०५३ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ११९८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७५ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी चौथ्यांदा वाढवून ३१ जून पर्यंत केली आहे.नगर जिल्ह्यात तीन तर कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे व तालुका पंचायत समितीचे आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन यांनी आपली कामगिरी चोख बजावल्याने तालुका कोरोना मुक्त झाला आहे.आता हा तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी शहरात व ग्रामपंचायत पातळीवर आता दक्षता समित्यांनी पोलिसांना मदत करणे हि बाब आवश्यक बनली आहे.
पोलिसानी अशा समित्यांची स्थापना गावोगाव केली आहे.शहरातही भाजप वसंत स्मृती यांच्या वतीने पोलिसांना स्वयंसेवक पुरविण्याची जबाबदारी घेऊन पोलिसांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.त्यांना आता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्वतः मदत करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.नुकतीच त्यांनी याबाबत साईबाबा चौक या ठिकाणी आपले कर्तव्य रात्री आठ पासून सकाळी ६ वाजे पर्यंत बजावलेले आहे.त्यांच्या सोबत संजय कानडे,सादिक शेख,अभिजित वहाडणे आदी मान्यवर होते.या स्वयंसेवकांनी साईबाबा कॉर्नर याठिकाणी रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत थांबून कोपरगाव शहरात विनापरवाना कुणीही व्यक्ती किंवा वाहनांना प्रवेश करू दिला नाही.अशा अनेक व्यक्तींना व वाहनांना परत पाठविण्यात आले.अशाच प्रकारे टाकळी फाटा,टाकळी नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी थांबून स्वयंसेवक प्रशासनास सहकार्य करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.