जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू अल्प दरात एकाच जागेवर खरेदी करण्याची संधी ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.नागरीकांचा आवडता हा ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव शनिवार दि.२४ऑक्टोबर पासून कोपरगावातील कृष्णाई मंगलकार्यालय येथे सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

पुष्पाताई काळे.
  "या उत्सवाच्या माध्यमातून दिवाळीच्या सणाला कोपरगावकरांना अल्प दरात दर्जेदार वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.याही वर्षी ‘दिवाळी हाट’ उत्सव शनिवार दि.२४ ऑक्टोबर ते सोमवार दि.२६ ऑक्टोबर असे तीन दिवस दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ,सजावटीचे साहित्य,तयार कपडे,पूजा साहित्य,विविध प्रकारचे आकाश कंदील खरेदी करता येणार आहे"- चैताली काळे,माजी संचालिका,जिल्हा बँक अहिल्यानगर.

    कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना आर्थिक हातभार मिळावा तसेच गृहोद्योग चालविणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांना आपली उच्च दर्जाची उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होऊन नागरिकांना उत्कृष्ठ प्रतीच्या वस्तू मिळाव्या अशा दुहेरी उद्देशातून गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी गेल्या काही वर्षापासून ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव सुरु केला आहे.दरवर्षी ‘दिवाळी हाट’ या खरेदी उत्सवाला कोपरगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला आहे.
   या उत्सवाच्या माध्यमातून दिवाळीच्या सणाला कोपरगावकरांना अल्प दरात दर्जेदार वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.याही वर्षी ‘दिवाळी हाट’ उत्सव शनिवार दि.२४ ऑक्टोबर ते सोमवार दि.२६ ऑक्टोबर असे तीन दिवस दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ,सजावटीचे साहित्य,तयार कपडे,पूजा साहित्य,विविध प्रकारचे आकाश कंदील खरेदी करता येणार आहे.‘दिवाळी हाट’च्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक वस्तू अल्प दरात मिळणार आहेत.या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा थेट फायदा स्थानिक महिला व्यावसायिकांना होणार आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close