जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी निवड होणार जाहीर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (अजित पवार गट) नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व याद्या जाहीर होण्याबाबत पक्षात अंतर्गत रस्सीखेच आणि वाद सुरू असल्याने निवड प्रक्रिया लांबणीवर पडली असताना आगामी काळात गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि नगरपरिषद डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रलंबित पदाधिकाऱ्यांनी लवकरच निवड जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

  “आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक काही महिन्यावर येथून ठेवली असताना या पदाधिकाऱ्यांच्या फौजा कामाला लावण्यासाठी पुन्हा एकदा पदाधिकारी निवडी जाहीर होण्याचे कयास व्यक्त होत आहे.त्यात कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या कार्यकारिण्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,राष्ट्रवादी महिला काँग्रेस,राष्ट्रवादी युवती काँग्रेस,ओबीसी विभाग,अल्पसंख्याक विभाग,सामाजिक न्याय विभाग,सोशल मीडिया विभाग,ज्येष्ठ नागरिक विभाग,डॉक्टर सेल,वकील सेल आदींचा समावेश राहणार आहे.

    कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटास नगराध्यक्ष पद मिळालं नाहीच पण त्यांचे नगरसेवक 07 वरून 11 वर गेले आहे.मत तरीही त्यांना पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांना नगराध्यक्षपद मिळण्यास आलेले अपयश हे आ.आशुतोष काळे यांचे जिव्हारी लागले असल्याची शक्यता झाली होती.परिणामी त्यांनी निवडणुकीनंतर सर्व कार्यकारिणी बरखास्त केली होती.शिवाय काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले किंवा आंतरबदली तरी केली होती.अजूनही काही जण त्यातून सावरलेले नाही.मात्र आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात त्याची भरपाई होण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा हाती पायताण घेतले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या कोअर कमिटीची आ.काळे यांनी दिनांक 19 जून 2026 रोजी घोषणा केली होती.मात्र तरी पदाधिकारी निवडीचे गाजर मात्र खुंटीला टांगून ठेवले होते.आता ते पुन्हा वर आले असल्याचे मानले जात आहे.

आ,आशुतोष काळे,कोपरगाव.

    दरम्यान त्यातच राज्यात महाआघाडी आणि महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे.कोणाचा पायपूस कोणाच्या पायी नाही अशी स्थिती ओढवली आहे.आता तर विरोधात कोण आणि सत्तेत कोण याचा काही कोणाला मागमूस असल्याचे दिसत नाही.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात आणि तालुक्यात भ्रष्टाचार उच्चांकी पातळीवर वाढला आहे.विशेष म्हणजे त्यात सत्ताधारी गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींचे दहा बोटे तुपात असल्याचे दिसून येत आहे.त्यातून आरोप प्रत्यारोप होत असून त्याला वैतागून अखेर कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी सदर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.त्याला सात ते आठ  महिने उलटून गेले आहे.त्यानंतर त्यांनी जून मध्ये मात्र कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली होती.त्यात सुनील गंगुले,दिनार कुदळे,मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,कृष्णा आढाव,विरेन बोरावके,बाळासाहेब रुईकर,रमेश गवळी,इम्तियाज अत्तार,शैलेश साबळे,विजय त्रिभुवन,सचिन गवारे,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी आदी चौदा जणांचा समावेश होता.आता यातून कोणाला पदाचा मेवा भेटणार आणि कोणाची गंछती होणार याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मोठी चर्चा झडत असल्याचे दिसून येत आहे.

  मात्र राज्यासारखेच पदाधिकारी निवडायला मुहूर्त लाभत असल्याचे दिसत नाही.आता आगामी जिल्हा परिषद निवडणूक काही महिन्यावर येथून ठेवली असताना या फौजा कामाला लावण्यासाठी पुन्हा एकदा पदाधिकारी निवडी जाहीर होण्याचे कयास व्यक्त होत आहे.त्यात कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या कार्यकारिण्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,राष्ट्रवादी महिला काँग्रेस,राष्ट्रवादी युवती काँग्रेस,ओबीसी विभाग,अल्पसंख्याक विभाग,सामाजिक न्याय विभाग,सोशल मीडिया विभाग,ज्येष्ठ नागरिक विभाग,डॉक्टर सेल,वकील सेल,सेवा दल तसेच सांस्कृतिक व क्रीडा आदी विभागाचा समावेश असणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close