न्यायिक वृत्त
संघटित गुन्हेगारी,आरोपीचा जामीन मंजूर!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राहुल विजय चवडके यासह अन्य ८ आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी राहुल चवंडके याला कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदर प्रकरणात संघटित गुन्हेगारीच्या कलमांचा गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली,तपासी अधिकारी यांनी पश्चात बुद्धीने व उशीराने सदरच्या गुन्ह्यात संघटीत गुन्हेगारीची कलमे लावल्याचा आरोप करत आरोपी राहुल चवंडके याचे विरुद्ध संघटित गुन्हेगारीची कलमे सिद्ध करण्याकरीता प्रथमदर्शनी पुरावे नसल्याचा बचाव घेण्यात आला होता.याशिवाय गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात आला असून तपासकामी आता आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता राहिलेली असा युक्तिवाद करण्यात आला होता.तो गृहीत धरून कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.
देश आणि राज्यातील संघटित गुन्हेगारीतील वाढ ही देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर व चिंताजनक समस्या बनली आहे.संघटित गुन्हेगारी वाढण्याची कारणे ही बेरोजगारी आणि गरिबी मानली जाते या शिवाय आर्थिक टंचाईमुळे तरुण सहजपणे चुकीच्या मार्गाला लागतात.याशिवाय सायबर गुन्हे,बेकायदेशीर पैसे ट्रान्सफर आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे.अनेकदा गुन्हेगारांना राजकीय आणि स्थानिक पातळीवर संरक्षण मिळते.अमली पदार्थांच्या तस्करीमुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे आणि गुन्हेगारी टोळ्या बळकट होत आहेत.त्यातून अनेक गुन्हे वाढत आहे त्याला कोपरगाव शहर आणि तालुका अपवाद नाही.त्यातून शहरात मोठी दहशत निर्माण होत असून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात काही महिन्यापूर्वी घडली आहे.त्यात आरोपी म्हणून राहुल विजय चवंडके याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गु.र.क्र.३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ (२) (ब),११९(१),११८(१),३२५ १८९(२),१९१(२),१९१(३),१९०,३२४(५),सह फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ व आर्म अॅक्ट कलम ४,२५ अन्वये गुन्हा दखल करण्यात आला होता.

या घटनेतील फिर्यादी साहिल कुरेशी यास घातक शस्त्राने मारहाण करून सुभाषनगर येथील वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात आरोपी राहुल चवंडके होता.त्याचे वतीने कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड.व्यंकटेश पंढरीनाथ खिस्ते व ॲड.केतन शिरोडे यांनी जामीनाकरीता अर्ज दाखल केला होता.सदर प्रकरणात संघटित गुन्हेगारीच्या कलमांचा गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली,तपासी अधिकारी यांनी पश्चात बुद्धीने व उशीराने सदरच्या गुन्ह्यात संघटीत गुन्हेगारीची कलमे लावल्याचा आरोप करत आरोपी राहुल चवंडके याचे विरुद्ध संघटित गुन्हेगारीची कलमे सिद्ध करण्याकरीता प्रथमदर्शनी पुरावे नसल्याचा बचाव घेण्यात आला होता.याशिवाय गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात आला असून तपासकामी आता आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता राहिलेली असा युक्तिवाद करण्यात आला होता.आरोपीच्या वतीने त्याची योग्य त्या अटी शर्तीसह जमीन मंजुर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती.
दरम्यान यात जिल्हा व सत्र न्यायाधीश दिपक बी.अलमले यांनी सरकार पक्षाचे व तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे विचारात घेऊन व आरोपींच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून नुकताच अटी शर्तीसह आरोपीस जमीन मंजूर केला आहे.सदर प्रकरणाकडे संपूर्ण कोपरगांव शहराचे लक्ष वेधले गेले होते.आरोपीच्या वतीने ॲड. व्यंकटेश खिस्ते व ॲड.केतन शिरोडे यांनी कामकाज पाहिले आहे.



