कोपरगाव तालुका
सामाजिक न्याय मार्फत १.१० कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी-…यांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील सामाजिक व पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि समाजबांधवांची मागणी पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय योजनेअंतर्गत मतदार संघातील विविध ६ विकास कामांसाठी १ कोटी १० लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

‘कोपरगाव तालुक्यातील या कामांमध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी २५ लाख रुपये,कोळगाव थडी येथे दलित वस्ती समाज मंदिर बांधण्यासाठी १५ लाख रुपये,जेऊर कुंभारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणाच्या कामासाठी १० लाख रुपये,काकडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये,करंजी येथे संत रविदास महाराज मंदिर सभा मंडप बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि धामोरी येथे संविधान भवन बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याचा दावा खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,आणि आता नव्याने विधानपरिषदेत गेलेले आ.विवेक कोल्हे यांनी केला आहे.त्यामुळे मतदारांनी या कार्यप्रवण लोकप्रतिनिधींचे कौतुक करून नगर-मनमाड व झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासाठी आता अशीच ताकद लावण्याची मागणी करून आपले कर्तृत्व दाखविण्याची उपरोधिक विनंती केली आहे.त्याबाबत मतदार संघात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
“राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना व विकासाकामांसाठी निधी मंजूर केला जातो.नवीन वसतिगृहे,सुशोभीकरण आणि वस्तीविकास योजनांच्या कामासाठी हा निधी वितरित केला जातो.राज्यभरात १२१० नवीन वसतिगृहे उभारण्याच्या प्रकल्पासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला असल्याची माहिती असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर केला जातो.त्याचा पाठपुरावा करून आ.काळे यांनी आपल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील 06 कामासाठी हा निधी मंजूर केला आहे.परिणामी या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रलंबित सामाजिक कामांना गती मिळणार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या कामांमध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी २५ लाख रुपये,कोळगाव थडी येथे दलित वस्ती समाज मंदिर बांधण्यासाठी १५ लाख रुपये,जेऊर कुंभारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणाच्या कामासाठी १० लाख रुपये,काकडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये,करंजी येथे संत रविदास महाराज मंदिर सभा मंडप बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि धामोरी येथे संविधान भवन बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे.मतदार संघातील सर्व समाजघटकांना सामाजिक,सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी इमारती व सुविधा मिळाव्यात अशी स्थानिक समाजबांधवांची अनेक दिवसांची मागणी होती.या मागणीची दखल घेऊन आ.काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.त्यामुळे मागणी पूर्ण झाल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्याबद्दल सर्व समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.


