जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात योग दिन उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असून कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.बी.रोहमारे महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

के.बी.रोहमारे महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे तो क्षण.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून रोजी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला आणि डिसेंबर २०१४ मध्ये याला मान्यता मिळाली.त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

     दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून रोजी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला आणि डिसेंबर २०१४ मध्ये याला मान्यता मिळाली.त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, जो ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.तो कोपरगाव येथील के.जे. सोमैया महाविद्यालयात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

   सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे आदीसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी प्रा.जावेद शाह यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले असून माणसाच्या जीवनात योग आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचा परिचय त्यांनी करून दिला.

  दरम्यान या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मनःशांती व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितले.तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योग केला पाहिजे असे आवाहन केले.
दरम्यान या वेळी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून दाखवले.त्यांच्या सोबत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योग केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close