जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

धनादेश देऊन फसवणूक,आरोपी कर्जदारास शिक्षा!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगांव श्रीराम ट्रांस्पोर्ट फायनान्स कंपनी कडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी साठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस.केळकर यांनी कर्जदारास एक वर्ष साध्या कारावासाची व आठ लाख रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास आणखी चार महिने कारावास व दंडाची रक्कम आठ लाख रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याची शिक्षा रामपूरवाडी तालुका राहाता येथील आरोपी सुनील सुधाकर सांबारे यास सुनावली आहे.याबाबत फिर्यादी बँकेने समाधान व्यक्त केले आहे.

  

कर्जदार सुनील सांबारे याने चारचाकी वाहनासाठी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड ठरलेल्या मुदतीत न केल्याने बँकेने त्यास नोटीस पाठवली होती.मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं होते.वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सदर कर्जाची परतफेडीसाठी अॅक्सिस बँक शाखा शिर्डी या बँकेचा 05 लाखांचा धनादेश ६ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेला होता.मात्र सदरचा धनादेश न वटता परत आला होता.परिणामी याबाबत कोपरगाव येथील न्यायालयात खटला दाखल झाला होता.त्यात न्यायालयाने आरोपीस ही शिक्षा सुनावली आहे.याबाबत फिर्यादी बँकेचे व्यवस्थापक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

   धनादेश देऊन त्याचा अनादर करण्याच्या प्रकरणात जर फसवणूक सिद्ध झाली,तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट च्या कलम १३८ अंतर्गत गुन्हेगाराला दंडासह २ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.फसवणूकीच्या स्वरूपावरून हा कालावधी कमी-जास्त होऊ शकतो.या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल होऊन त्यात गुन्हेसिद्धीचे प्रमाण अलीकडील काळात चांगलेच वाढले असल्याचे दिसून येत आहे.परिणामी धनादेश देऊन फसवणूक करण्याच्या घटना कमी होण्याची शक्यता वाढली आहे.अशीच घटना रामपूरवाडी येथील आरोपी सुनील सांबरे याचे बाबत घडली होती.यातील आरोपी सुनील सुधाकर सांबारे यांने श्रीराम ट्रांस्पोर्ट फायनान्स कंपनीकडून मारुती स्विफ्ट व्ही.डी.आय.या चार चाकी वाहन (क्रमांक एम.एच.१७ ए.झेड.-७७९१) यावर ५ लाखांचे कर्ज घेतलेले होते.सदर कर्जाची परतफेड सुनील सुधाकर सांबारे यांनी ठरलेल्या मुदतीत न केल्याने बँकेने त्यास नोटीस पाठवली होती.मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं होते.वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सदर कर्जाची परतफेडीसाठी अॅक्सिस बँक शाखा शिर्डी या बँकेचा 05 लाखांचा धनादेश ६ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेला होता.मात्र सदरचा धनादेश न वटता परत आला होता.परिणामी फिर्यादी श्रीराम फायनान्स कंपनीने सुनील सुधाकर सांबारे यांचे विरुद्ध कोपरगांव येथील अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कडे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा कलम १३८ अन्वये खटला दाखल केला होता.

   सदर खटल्यात फिर्यादी कंपनीचे वतीने शाखा व्यवस्थापक गोपाल सुभाष शिंदे यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस.केळकर यांनी कर्जदारास एक वर्ष कारावास व आठ लाख रुपये दंड ठोठावला आहे.या शिवाय दंड न भरल्यास आणखी चार महिने कारावास व दंडाची रक्कम आठ लाख रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून दिले जावेत अशी शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्यात मध्ये फिर्यादी कंपनी तर्फे युवा वकील ॲड.गणेश भाकरे यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ऍड.अर्शद शेख यांनी सहकार्य केले असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.न्यायालयाच्या न्या.केळकर यांच्या या निकाला बाबत फिर्यादी बँकेने समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close