जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात एका टोळक्याची दहशत,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात रविवारी रात्रीच्या एका टोळक्याने हातात तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन दहशत माजवली असल्याचे दिसून आले असून यात सुभाषनगर,धारणगाव रोड परिसरात या तरुणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला चढवला याप्रकरणी सोमवारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळक्यांच्या हल्ल्यात झालेले चार चाकीचे नुकसान दिसत आहे.

दरम्यान यातील फिर्यादी साहिल कुरेशीच्या पान टपरीवर कांही तरूण आले होते त्यांनी त्यांचेकडे मावा गुटखा मागितला होता.त्यांना उधारीवर मावा देण्यास कुरेशी याने नकार दिला.त्याचा राग येवून तरूणांनी कुरेशी यास मारहाण केली असल्याची बातमी आहे.दरम्यान त्यानंतर काही वेळाने आणखी काही तरूण एकत्र जमले होते त्यांनी सुभाषनगर, धारणगाव रोडवर दिसेल त्या वाहनांवर लाकडी दांडक्याने प्रहार करण्यास सुरुवात केली होती.

   कोपरगाव नगरपरिषद हद्दीत उनाड टोळक्याना धाक असल्याचे दिसून येत नाही.परिणामी वाळूचोर,गावठी कट्टे,गुटखा,मटका,आदी अवैध व्यवसाय आदींना मोठी बरकत आली असल्याचे मानले जात आहे.त्यांना चाप लावणे गरजेचे बनले आहे.रेशन घोटाळा,अवैध गोवंश हत्या आदींची त्यात भर पडत आहे.वारंवार तेच ते गुन्हेगार यात आढळून  येत आहे.त्यामुळे शहर पोलिसांना या विरोधात मोठी आणि कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे.काळ रात्रीच एक आणखी तमाशा उघड झाला आहे.यात  एका टोळक्याने उघड दहशत माजेल असून यामुळे कोपरगाव शहरातील धरणगाव परिसर आणि सुभाषनगर आदी परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत मावा दिला नाही म्हणून हा वाद सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे.

धारणगाव रोडवरील अन्य एका वाहनाचे केलेले नुकसान दिसत आहे.

   याप्रकरणी साहिल ऊमर कुरेशी यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैभव कुऱ्हाडे,राहुल चवंडके,भोऱ्या,अरबाज (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   दरम्यान यातील फिर्यादी साहिल कुरेशीच्या पान टपरीवर कांही तरूण आले होते त्यांनी त्यांचेकडे मावा गुटखा मागितला होता.त्यांना उधारीवर मावा देण्यास कुरेशी याने नकार दिला.त्याचा राग येवून तरूणांनी कुरेशी यास मारहाण केली असल्याची बातमी आहे.दरम्यान त्यानंतर काही वेळाने आणखी काही तरूण एकत्र जमले होते त्यांनी सुभाषनगर, धारणगाव रोडवर दिसेल त्या वाहनांवर लाकडी दांडक्याने प्रहार करण्यास सुरुवात केली होती.घरांवर तसेच वाहनांवर दगडफेक केली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान पोलिसांनी सोमवारी दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close