जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

माजी खा.काळे यांची जयंती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   माजी खादार आणि सहकार चळवळीतील अग्रणी नेते शंकरराव काळे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.०६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी ९ वाजता पंचायत समिती,कोपरगाव येथे व त्यानंतर सकाळी ०९.३० वा.कारखाना कार्यस्थळावरील काळे स्मृती-उद्यान,गौतमनगर येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी दिली आहे.

स्व.शंकरराव काळे.

  

स्व.शंकरराव काळे यांनी सहकार चळवळीतून ग्रामीण भागाचा विकास साधला,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उभारला त्यात ते संस्थापक संचालक होते.याशिवाय त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला.
त्याचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे शेतकरी कुटुंबात झाला होता.कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका आणि पुढे ‘कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना’ द्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले होते.

  कर्मवीर शंकरराव काळे (जन्म १९२१-मृत्यू २०१२) हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एक ज्येष्ठ सहकार नेते,शिक्षण क्षेत्रातील अग्रणी आणि माजी खासदार होते.त्यांनी सहकार चळवळीतून ग्रामीण भागाचा विकास साधला,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उभारला त्यात ते संस्थापक संचालक होते.याशिवाय त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला.
त्याचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे शेतकरी कुटुंबात झाला होता.कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका आणि पुढे ‘कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना’ द्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले होते.सन -१९७२ ते १९८० दरम्यान ते दोनदा पारनेर विधानसभेचे सदस्य,तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आणि १९९१-१९९६ कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.त्यांनी १९७० मध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची स्थापना,ज्याद्वारे ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती.आणखी या शैक्षणिक संस्था आपले कार्य पार पाडत आहेत.त्यांची जयंती उद्या मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शिक्षण,उद्योग व सहकार क्षेत्रात अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि हजारो कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.त्यांच्या १०५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close