पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या गावी होणार वीरभद्र यात्रा महोत्सव !

न्यूजसेवा
कोपरगाव-(शिवाजी गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत बिरोबा चौक येथील ग्रामस्थ व पंच कमेटी श्री राजा विरभद्र मंडळ आदींचे संयुक्त विद्यमाने याहीवर्षी दिनाक 1 व 02 फेब्रुवारी रोजी श्री राजा वीरभद्र महाराज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा कोपरगाव तालुक्यातील व संवत्सर पंचक्रोशीतील ग्रामस्थानी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योजकानी केले आहे.

आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञसमारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.भगवान शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्यांनी आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली असे मानले जाते.
श्री वीरभद्र महाराज यांची कथा पद्मपुराण आणि महाभारतात मिळते.स्वायंभूव मन्वंतरात दक्षप्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले.मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञसमारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.भगवान शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्यांनी आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.

दरम्यान शिवाने वीरभद्राला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली.रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.हे देवस्थान गावोगाव असून ते गावाची संरक्षक देवता मानली जाते.संवत्सर येथेही जागृत देवस्थान म्हणून श्री वीरभद्र महाराज यांना मान्यता आहे.त्यांचा यात्रा महोत्सव दरवर्षी संपन्न होत असतो यावर्षीही तो दोन दिवस संपन्न होत आहे.

सदर कार्यक्रम रविवार दिनांक ०१फेब्रुवारी ते सोमवार दिनांक ०२फेब्रुवारी पर्यंत संपन्न होणार आहे.रोजी पहाटे ४.०० ते ९.०० विधी व महापुजा सकाळी ७.०० ते ९.०० भव्य कावडी मिरवणुक संपन्न होणार आहे.याशिवाय सकाळी ९.०० ते ११ प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे जाहिर हरिकिर्तन होणार आहे.सायंकाळी 04 वाजता काठी मिरवणूक व काठी पूजा संपन्न होणार आहे.रात्री 09 वाजता स्थानिक भजनी मंडळाचे श्री हरी भजन होणार आहे.तर दुसऱ्या दिवशी 02 फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वाजता होइक कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संवत्सर येथील आयोजकांनी केले आहे.



