गृह विभाग
पोलिस ठाण्याच्या इमारतीला वाली नाही,आंदोलनाचा इशारा…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
गेली अनेक दशके इमारतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीला 28 कोटींचा निधी मिळाला आणि इमारतीसह पोलिस वसाहतीची इमारत पूर्ण होऊन जवळपास वर्षे उलटत आले आहे मात्र सातत्याच्या निवडणुका आणि त्यात गुंतलेले नेते आणि प्रशासन आदी कारणामुळे या इमारतीला मुहूर्त लाभत नसल्याने पोलिसांची आणि त्यांच्या कुटुंबाची तारांबळ उडताना दिसत आहे.परिणामी त्यांचे घरभाड्यापोटी हजारो रुपये खर्ची पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.याबाबत भारत मोरे,अनिल गायकवाड,विनय भगत आदींनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

सदर इमारतीची 28 कोटी निधी मंजूर झाला होता.सदर निविदा ही आमच्या कंपनीने 12.5 टक्के कमी दराने भरली होती.दरम्यान यात प्रशासकीय इमारतीसाठी 06 कोटी तर 19 कोटी रुपयांच्या दोन इमारती पोलिस वसाहतीच्या आहेत.त्यांचे बांधकाम एप्रिल 2025 मध्ये पूर्ण होऊन त्यातील फर्निचर,विद्युत फिटिंग,पाणी व्यवस्था,सी.सी.टी.व्हि.यंत्रणा,अग्निरोधक व्यवस्था,इमारत रंगरंगोटी,परिसरात पेव्हर ब्लॉक,आदींचे कामे पूर्ण झाली आहे”-जयदीप गवांदे,अभियंता,के.के.जी.कन्स्ट्रक्शन’,संगमनेर.
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकसंख्येचा निकष वापरून सन-2014 साली स्वतंत्र तालुका पोलिस ठाणे निर्माण केले होते.त्याचे सन-2015 साली गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे हस्ते त्याची स्थापना व उद्घाटन करण्यात आले होते.त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊन नागरिकांना सोयी उपलब्ध झाल्या आहेत.(मनुष्यबळ अद्याप मिळाले नाही हे वास्तव आजही ‘जैसे थे ‘ आहे हा भाग वेगळा) दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून राज्य सरकारकडून शहर पोलिस ठाण्याची इमारत मंजूर केली होती.तिचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे तत्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदींना निमंत्रित करून मोठा गाजावाजा करत ते उरकले होते.त्याआधी गावकरीसह विविध माध्यमांनी वेळोवेळी या शहर पोलिस ठाण्याचे इंग्रज कालीन इमारतीची आणि पोलिस वसाहतीची दयनीय स्थिती मालिकेद्वारे मांडली होती.त्यावेळी संबंधित मंत्र्यांना आ.काळे यांनी नूतन शहर इमारतीतून पोलिस वसाहतीची दयनीय स्थितीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खिडकीतून (रमणीय) दर्शन घडवले होते.त्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी या कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची व पोलिस वसाहतीची नवीन इमारतीसाठी 28 कोटींचा निधी मंजूर केला होता.त्यात 06 कोटींची प्रशासकीय इमारत व बाकी 19 कोटी रुपयांसाठी पोलिस वसाहतीसाठी निधी मंजूर केला होता.त्याची निविदा प्रसिद्ध होऊन सदर काम गेल्यावर्षी पूर्ण झाले आहे.सदर काम हे संगमनेर येथील के.के.जी.कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते.त्यांनी पोलिस ठाण्याची प्रशासकीय इमारत व दोन पोलिस वसाहतीच्या इमारतींचे काम वेळेत म्हणजेच 24 एप्रिल 2024 रोजी पूर्ण केले असल्याचे सांगितले आहे.

“कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची जुनी इमारत ही जीर्ण आणि गळकी झाली असून नवीन इमारतीत बसविण्यासाठी सुमारे 06 लाख रुपयांची अद्यावत क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम आली आहे.ती बसविण्यासाठी जुनी इमारत योग्य नाही त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून सारखा तगादा सुरू आहे.मात्र उद्घाटन होत नसल्याने सदर सिस्टिम जुन्या इमारतीत बसविणे अवघड होत आहे”-संदीप कोळी,पोलिस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.
मात्र त्यानंतर नगरपरिषद निवडणूक आणि आता त्या पाठोपाठ आता जिल्हापरिषद निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे.त्यामुळे आगामी काळात तरी हे उद्घाटन लवकर होण्याची चिन्हे दिसत नाही.त्यामुळे कोपरगाव शहरातील शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,विनय भगत आदींनी राज्याचे गृहमंत्री,पालकमंत्री पोलिस महानिरीक्षक आदींना पत्रव्यवहार करून सदर इमारतीचे उद्घाटन कार्याची विनंती केली आहे.मात्र त्या मागणीकडे पाहण्यास कोणालाही वेळ असल्याचे दिसून येत नाही.परिणामी त्यांनी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना आजच एक निवेदन देऊन आपण उपोषण करणार असल्याचे कळवले आहे.त्यामुळे आता राज्याचा गृह विभाग आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

“राज्यातील महापालिका निवडणुका आजच संपन्न झाल्या असून नगरपरिषदा निवडणुका पाठोपाठ त्या निवडणुका संपन्न झाल्या असल्याने राज्याचे मान्यवर नेत्याची वेळ उपलब्ध होत नव्हती मात्र आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुढील आठवड्यात वेळ घेत असून त्यांची वेळ न मिळाल्यास आपण जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते उद्घाटन करणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
सदर इमारतीची 28 कोटी निधी मंजूर झाला होता.सदर निविदा ही आमच्या कंपनीने 12.5 टक्के कमी दराने भरली होती.दरम्यान यात प्रशासकीय इमारतीसाठी 06 कोटी तर 19 कोटी रुपयांच्या दोन इमारती पोलिस वसाहतीच्या आहेत.त्यांचे बांधकाम एप्रिल 2025 मध्ये पूर्ण होऊन त्यातील फर्निचर,विद्युत फिटिंग,पाणी व्यवस्था,सी.सी.टी.व्हि.यंत्रणा,अग्निरोधक व्यवस्था,इमारत रंगरंगोटी,परिसरात पेव्हर ब्लॉक,आदींचे कामे पूर्ण झाली असल्याची माहिती ‘ के.के.जी.कन्स्ट्रक्शन’ चे अभियंता जयदीप गवांदे यांनी दिली आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची इमारत पूर्ण झाली आहे.मात्र आमची जुनी इमारत ही जीर्ण आणि गळकी झाली असून नवीन इमारतीत बसविण्यासाठी सुमारे 06 लाख रुपयांची अद्यावत क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सि.सी.टी.एन.एस.)आली आहे.ती बसविण्यासाठी जुनी इमारत योग्य नाही त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून सारखा तगादा सुरू आहे.मात्र उद्घाटन होत नसल्याने सदर सिस्टिम जुन्या इमारतीत बसविणे अवघड होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे.



