अपघात
कोपरगावात एकाचा मृत्यू,सर्वत्र हळहळ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात धारणगाव रोड लगत असलेल्या बाबा पेंट्स मध्ये काम करत असलेले इसम प्रवीण बाबुराव लोंढे (वय-53) हे दोन दिवसापूर्वी गायब झाले होते.त्याबाबत आज दुपारी शहर पोलिस ठाण्यात हरवले असल्याची नोंद करण्यात आली असताना आज सायंकाळी 07 बाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाचे शव गोदावरी नदीच्या छोट्या पुलाजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आले आहे.त्यास पोलिसांनी वर काढले असता ते गायब इसम प्रवीण लोंढे यांचे असल्याचे उघड झाले आहे.

मयत इसम प्रवीण लोंढे हे रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते.याबाबत त्यांचे नातलगांनी दोन दिवस शोध घेतला असता ते मिळून आले नव्हते.त्यांनी अखेर कंटाळून आज दुपारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात हरवले असल्याचे नोंद केली होती.मात्र आज सायंकाळी ते मृत अवस्थेत सापडले आहे.
मयत इसम प्रवीण लोंढे हे रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते.याबाबत त्यांचे नातलगांनी दोन दिवस शोध घेतला असता ते मिळून आले नव्हते.त्यांनी अखेर कंटाळून आज दुपारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात हरवले असल्याचे नोंद केली होती.मात्र आज सायंकाळी 07 वाजेच्या सुमारास गोदावरी नदी वरील श्री संत जनार्दन सेतू वरून काही नागरिक जात असताना त्यांना एक इसम पाण्यात तरंगताना आढळून आला होता.त्याबाबत नागरिकांनी ही खबर पोलिसांना दिली होती.

दरम्यान शहर पोलिसांनी सदर इसम ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.त्याठिकाणी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.पोलिसांनी याबाबत या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.त्यांच्यावर उद्या सकाळी कोपरगाव येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,तीन मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



