जाहिरात-9423439946
ग्रामविकास

पंचायत राज अभियानात…या ग्रामपंचायतींची बाजी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यात राज्य शासनाचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले असून यात ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टी आणि पाणी पट्टी वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते.त्यात तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतीच्या गटात शिंगणापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक 22 लाख 45 हजार 295 रुपयांची वसुली करून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर वारी ग्रामपंचायतीने 22 लाख 53 हजार 280 रुपयांची वसुली करून द्वितीय क्रमांक तर 17  लाख 17 हजार 641 रुपयांची वसूल करून तृतीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  

दरम्यान या मोहिमेसाठी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,पंडित वाघेरे,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,प्रशांत तोरवणे,प्रशांत वाघमारे आदींनी ग्रामस्तरावर वारंवार बैठका घेऊन ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थांत जनजागृती केली होती.त्याचा हा परिपाक असल्याचे मानलेजात आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”राज्य शासनाचे वतीने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले आहे.हा महाराष्ट्र शासनाचा ग्रामपंचायतीसाठी एक उत्साहवर्धक उपक्रम आहे,ज्याचा उद्देश ग्रामपंचायतींना सक्षम करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे,लोकांना शासकीय सेवा देणे,गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि लोकसहभागातून सुशासन आणणे हा आहे,ज्यामुळे गावे स्वावलंबी,स्वच्छ आणि समृद्ध होतील असा कयास व्यक्त होत आहे.

गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि यांच्या सहकाऱ्यांनी गावोगाव आयोजित केलेल्या बैठका दिसत आहेत.

   या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे पंचायत व्यवस्थेत सुशासन आणणे सह ‘आपले सरकार सेवा केंद्र’ द्वारे ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांना सरकारी सेवा उपलब्ध करून देणे आणि तक्रारींचे निवारण करणे,ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती सुधारणे (उदा. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करणे) आणि इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे,प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करणे,सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलात बचत करणे,आणि गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे,मनरेगा आणि इतर योजनांची अंमलबजावणी करणे,घरांची कामे पूर्ण करणे,यात ग्रामस्थांना अभियानात सहभागी करून घेणे आणि लोकचळवळ निर्माण करणे अपेक्षित होते.हे अभियान ग्रामपंचायतींच्या कामाचे मूल्यमापन करते आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून विशेष निधी देणार आहे.याचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा ठरविण्यात आला होता.हे अभियान फक्त एक स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक बदलाची दिशा आहे असे मानले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

   दरम्यान या कालावधीत कोपरगाव तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींनी यात सहभाग नोंदवला होता.त्यात वसुलीसाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निर्धारित करण्यात आली होती.त्यात घरपट्टी वसुलीचे आकडे समोर आले आहे.त्यात वरील शिंगणापूर,वारी आणि पोहेगाव आदी ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   दरम्यान या मोहिमेसाठी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ,सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब साबळे,पंडित वाघेरे,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,प्रशांत तोरवणे,प्रशांत वाघमारे आदींनी ग्रामस्तरावर वारंवार बैठका घेऊन ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थांत जनजागृती केली होती त्याचा हा परिपाक असल्याचे मानले जात आहे.सदर योजना राबविणारे अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी आदींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close