जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या ग्रामपंचायत हद्दीत गोवंश हत्येचा गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

   राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द हद्दीत एका इसमाने त्याचे घराचे समोर असलेल्या शेड मध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने डांबून ठेवले असल्याची बातमी मिळाल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी रात्री 11 वाजता केलेल्या कारवाईत पो.कॉ. बाळू भाऊराव धोंगडे यांनी केलेल्या फिर्यादीवरून युनुस सिकंदर सय्यद (वय-50) याचे विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान कोपरगाव तालुक्यात गोरक्षक मंडळी गोवंश जातीची जनावरे वाचवण्यासाठी मोठ्या जोमात असल्याचे दिसून येत आहे.मात्र शेतकऱ्यांची खाटी जनावरे त्यांनी कशी सांभाळण्याची असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.सरकारने ही जनावरे सांभाळण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.

  महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील संजयनगर येथील आयेशा कॉलनी आणि आता कोपरगाव तालुक्यातही असे गुन्हे होताना आढळून येत आहे.अशीच गुप्त खबर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त खबऱ्याकडून मिळाली असता त्यांनी पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने,दिपक रोठे आदींनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन व घटनास्थळी जाऊन डाऊच खुर्द या ठिकाणी दोन पंच रवाना केले असता त्या ठिकाणी संशयित आरोपी युनुस सिकंदर सय्यद याचे घराचे समोर असलेल्या शेड मध्ये काही गोवश जातीचे जनावरे आढळून आली आहे.त्यांचेकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्याने सदर जनावरे ही कोपरगाव लक्ष्मीनगर येथील रहिवासी संशयित आरोपी सज्जू हाजी (पूर्ण नाव माहिती नाही) याची असल्याची माहिती दिली आहे.

  दरम्यान यात पोलिसांना आरोपी युनुस सय्यद याचे घराचे समोर असलेल्या शेडमधील गोवंश जनावरे आढळून आली आहे.त्यात 5 हजार रुपये किंमतीचे सफेद रंगाचा लालसिंग असलेला अंदाजे 2 वर्ष वयाचा गोवंस जातीचा गोऱ्हा,6 रुपये किंमतीचे एक तांबड्या रंगाचा अंदाजे 4 वर्ष वयाची गाय,4 हजार रुपये किंमतीचे एक तांबड्या रंगाचा शिंगे नसलेला अंदाजे 1 वर्ष वयाचा गोरा,10 हजार रुपये किंमतीचे एक काळ्या व पांढ-या रंगाची अंदाजे 10 वर्ष वयाची गाय,4 हजार रुपये किंमतीचा एक तांबड्या व पांढ-या रंगाचा अंदाजे 1 वर्ष वयाचा गोरा,4 रुपये रुपये किंमतीची एक काळ्या व पांढ-या रंगाची बारीक शिंगे असलेली अंदाजे 2 वर्ष वयाची कालवड,5 रुपये किंमतीची एक एक काळ्या व पांढ-या रंगाची बारीक शिंगे असलेली अंदाजे 3 वर्ष वयाची कालवड असे 07 विविध गोवंश जनावरे त्यांची एकूण किंमत एकूण 38,हजार प्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जातीचे जनावरे कत्तल करुन मास विक्री करण्याचे उद्देशाने आढळून आली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.26/२०२6 भारतीय न्याय संहिता कलम 325 सह महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधिनीयम १९७६ चे सुधारीत अधिनीयम २०१५चे कलम 32५ कलम 5(क)9(अ)११ प्रमाणे आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.किशोर जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close