ग्रामविकास
..या गावी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘जीवनदान महाकुंभ-२०२६’ व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान जवळके ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज जवळके हनुमान मंदिर सभामंडप या ठिकाणी रक्तदान शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले आहे.त्याला जवळके,धोंडेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे,

“रक्तदान शिबिराचे अनेक फायदे आहेत,जसे की हृदयविकाराचा धोका कमी होतो,रक्तातील लोहाची पातळी नियंत्रित राहते,रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात,तसेच यामुळे मानसिक समाधान मिळते आणि हे एक ‘महादान’असून गरजूंचा जीव वाचवते.नियमित रक्तदानाने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि वजन कमी करण्यासही अप्रत्यक्ष मदत मिळते.नाणीज धामच्या वतीने अवयव दान हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू आहे” -उज्ज्वला कोल्हे,अध्यक्षा,कोपरगाव तालुका,नाणीज धाम संघटना.
कोपरगाव तालुक्यात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान,नाणीजधाम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनदान महाकुंभ – २०२६’ व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान जवळके ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज जवळके येथे पहिले रक्तदान शिबिर जवळके मोठ्या उत्साहात पार पडले आहे.संपूर्ण भारतभर ४ ते १८ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या जीवनदान महाकुंभ सुरू असून त्या अंतर्गत जवळके येथे हा उपक्रम आज सकाळी संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,शिवसेना (शिंदे गट)तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात,माजी सरपंच बाबुराव थोरात,जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान,नाणीजधाम संघटनेचे भोपाळ येथील निरीक्षक प्रशांत खंडागळे,मध्यप्रदेश धार जिल्हा निरीक्षक नवनाथ गुडघे,तालुकाध्यक्ष महेंद्र सिनगर,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उज्ज्वला कोल्हे,जवळके ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच वाल्मीक भोसले,विजय थोरात,बाळासाहेब गव्हाणे,डॉ.सुनील शिंदे,कामगार पोलिस पाटील सुधीर थोरात,गोरक्षनाथ पाचोरे,माजी सदस्य पप्पू थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,विठ्ठल थोरात,सुरेश चंदनशिव,नंदा चंदनशिव,शिवाजी भोसले,नामदेव थोरात,निलेश पाचोरे,विजय शिंदे,बबन शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे आदिसंह बहुसंख्य ग्रामस्थ आणि युवक,सेवा केंद्रातील गुरुबंधू बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी उज्ज्वला कोल्हे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना,”रक्तदान शिबिराचे अनेक फायदे आहेत,जसे की हृदयविकाराचा धोका कमी होतो,रक्तातील लोहाची पातळी नियंत्रित राहते,रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात,तसेच यामुळे मानसिक समाधान मिळते आणि हे एक ‘महादान’ असून गरजूंचा जीव वाचवते.नियमित रक्तदानाने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि वजन कमी करण्यासही अप्रत्यक्ष मदत मिळते.नाणीज धामच्या वतीने अवयव दान हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू असल्याची माहिती शेवटी उज्ज्वला कोल्हे यांनी दिली असून यावेळी रक्त संकलन करण्यासाठी संगमनेर येथील अर्पण संकलन केंद्राची मोठी मदत मिळाली असल्याचे शेवटी सांगितले आहे.

दरम्यान आज संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात आज जवळपास 22 रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवून आपले सामाजिक दायित्व निभावले असून त्यांचे नाणीज धाम व जवळके ग्रामपंचायत,सरपंच सारिका थोरात,आदींनी अभिनंदन करून या कार्याचे कौतुक केले आहे.तर उज्ज्वला कोल्हे यांनी नाणीज धाम च्या वेतन अवयव दान उपक्रम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.यावेळी नाणीज धाम च्या सेवेकऱ्यांनी मोठी भूमिका निभावली असल्याची माहिती शिवाजी भोसले,सुरेश चंदनशिव आदींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



