दुष्काळ
उन्हाळा लांबच तरी…या गावाने केली टँकरची मागणी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यासह कोपरगाव तालुक्यात यावर्षी पुरेसा पाऊस पडला असला व भूजल पातळी पुरेसी दिसत असली तरी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी कालव्याचे आवर्तन वेळेत न सुटल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून वर्तमानात 6-7 दिवसांनी ग्रामस्थाना पाणी मिळत असल्याने यांनी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन टँकरची मागणी केली आहे.त्यामुळे आता तहसीलदार सावंत नेमकी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिली आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1953 साली कोपरगाव तालुक्याला भारताचा कॅलिफोर्निया ही उपाधी दिली होती.मात्र गेल्या सहा ते सात दशकात नेमके उलटे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.शेतीला पाणी नाहीच पण पिण्याला पाणी मिळत नाही हे दुर्दैवी मानले जात आहे.ही तालुक्याने साधलेली प्रगती की अधोगती असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.तालुक्याचे बारमाही शेती पाण्याचे ब्लॉक गेलेच पण सिलिंगच्या नावाखाली घेतलेल्या जमिनीही गेल्या आहेत.मात्र जनता ढिम्मच आहे.
कोपरगाव तालुका साठच्या दशकात भारताचा कॅलिफोर्निया समजला जात होता.दस्तुरखुद भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1953 साली ही उपाधी या तालुक्याला दिली होती.मात्र गेल्या सहा ते सात दशकात नेमके उलटे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.शेतीला पाणी नाहीच पण पिण्याला पाणी मिळत नाही हे दुर्दैवी मानले जात आहे.ही तालुक्याने साधलेली प्रगती की अधोगती असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.तालुक्याचे बारमाही शेती पाण्याचे ब्लॉक गेलेच पण सिलिंगच्या नावाखाली घेतलेल्या जमिनीही गेल्या आहेत.आता शेती तर जाऊ द्या पण शहराला पाण्यास लवकर पाणी मिळत नाही.आजही शहराला चार दिवसांनी पाणी मिळते हे कोणीही नाकारू शकत नाही.ग्रामीण आणि दुष्काळी भागाची तर तऱ्हा विचारू नका अशी एकूण स्थिती.मात्र याला जबाबदार कोण ? असा साधा प्रश्न मतदारांना कधीही पडत नाही हे विशेष !नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत हा कळीचा मुद्दा कोणीही पोटतिडकीने मांडला ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी आल्याशिवाय राहणार नाही.आता हेच पाहा ना वेळापूर ग्रामपंचायत ही गोदावरी उजव्या कालव्याच्या उशाला आहे.तरीही या गावाला पाणी टंचाई जाणवायला लागली आहे.तीही जानेवारी महिना अद्याप पहिला हप्ता आताच कुठे संपला आहे या स्थितीत.उन्हाळा अद्याप दोन महिने बाकी आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीने नुकतीच एक मागणी केली आहे.त्यात ही महत्वाची मागणी केली आहे.त्यावर सरपंच म्हणून वैशाली सतीश भोसले व ग्रामपंचायत अधिकारी म्हणून डी.जे.वारुळे यांची सही आहे.

“वेळापूर येथे गोदावरी उजवा तट कालव्याचे आवर्तन वेळेत न सुटल्याने पिण्याच्या व वापराच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.ग्रामपंचायतकडे अस्तित्वात असलेल्या दोन्ही विहिरींना पाणी उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांना दर ६-७ दिवसांनी अपुरा पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे तातडीने टँकर उपलब्ध करून द्यावा” -वैशाली भोसले,सरपंच,वेळापूर.
त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”आमचे मौजे वेळापूर येथे गोदावरी उजवा तट कालव्याचे आवर्तन वेळेत न सुटल्याने पिण्याच्या व वापराच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.ग्रामपंचायतकडे अस्तित्वात असलेल्या दोन्ही विहिरींना पाणी उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांना दर ६-७ दिवसांनी अपुरा पाणीपुरवठा होत आहे.या बाबत नागरिकाच्या अनेक तक्रारी ग्रामपंचायत प्राप्त झालेल्या आहे.त्यानुसार नागरिकांनी तहसीलदार,कोपरगाव यांचेकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव करावा असी मागणी केलेली आहे तरी आपले स्तरावरून पहाणी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेवटी केली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा कोपरगाव या कॅलिफोर्नियाचे वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांना लवकरच टंचाई आराखडा तयार करावा लागणार अशी चिन्हे दिसू लागली आहे.



