उद्योग
…या तारखेला होणार गोदाकाठ महोत्सव !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा महिला बचत गटांचा महाउत्सव म्हणून ‘गोदाकाठ महोत्सव’ राज्यात ओळखला जातो.हा ‘गोदाकाठ महोत्सव’ आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.०९ पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे असल्याचे माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

या गोदाकाठ महोत्सवात विविध महिला बचत गटांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ,पारंपरिक व आधुनिक पदार्थ,शेतीपूरक व्यवसायातील उत्पादने,हस्तकला वस्तू,सणासुदीच्या वस्तू,कपडे,दागिने,गृह उद्योगातून तयार केलेली उत्पादने आदींचा समावेश असणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेती पाणी महानगर आणि उद्योगांना वाटून गेल्याने व कोपरगाव शहरातील व्यापार उदीम उध्वस्त झाल्याने व्यापारी महासंघ आणि लायन्स क्लब यांनी संयुक्तपणे यात पुढाकार घेऊन गेल्या दहा वर्षापासून कोपरगाव शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन येथे पुन्हा नव्याने हा महोत्सव सुरू केला होता.कधी तो लोढा मंगल कार्यालयात तर कधी अन्यत्र हा उपक्रम सुरू केला होता.पूर्वी 1962 ते 1972 या दरमैन जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तत्कालीन आ.शंकरराव काळे यांनी पुढाकार घेऊन शेतीचे नवनवीन तंत्र शेतकऱ्यांना अवगत व्हावे व त्याचा उपयोग शेती क्षेत्रात व्हावा यासाठी महात्मा गांधी येथील प्रदर्शन येथे कृषी प्रदर्शन सुरू केले होते.मात्र मध्यंतरीच्या काळात याकडे राजकीय नेतृत्वाचे दुर्लक्ष झाल्याने तालुक्याची आणि शहराची रया गेली होती.हा व्यापार उदीम पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू व्हावा यासाठी व्यापारी महासंघ आणि लायन्स क्लब यांनी पुढाकर घेऊन हा उपक्रम सुरू केला होता.याला आधी कमी प्रतिसाद मिळाला होता.मात्र उत्तरोतर त्याला प्रतिसाद वाढत गेला आहे.आता काही वर्षापासून आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे.हा उपक्रम येत्या शुक्रवार पासून सुरु होणार असून त्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या उपक्रमात महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देवून बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अल्पदरात बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स उपलब्ध करून दिले जात आहे.
याहीवर्षी गोदाकाठ महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार दि.०९ रोजी दुपारी ४.०० वाजता प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या गोदाकाठ महोत्सवात विविध महिला बचत गटांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक व आधुनिक पदार्थ,शेतीपूरक व्यवसायातील उत्पादने,हस्तकला वस्तू,सणासुदीच्या वस्तू,कपडे,दागिने,गृह उद्योगातून तयार केलेली उत्पादने आदींचा समावेश असणार आहे.या महोत्सवाचा शहर आणि तालुक्यातील नागरिक आणि महिला अल्पबचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.



