ग्रामविकास
…या ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांसाठी मोठे योगदान-पोकळे

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत आपल्या ग्रामस्थांसाठी मोठे सामाजिक काम करत असून आरोग्याबाबत अनेक शिबिरांचे आयोजन करत असून त्यातून ग्रामस्थ आणि महिलांचे आरोग्यास मोठी मदत मिळत असल्याचे प्रतिपादन जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या आत्मा मालीक हॉस्पिटलचे व्यवस्थापक सुनील पोकळे यांनी नुकतेच केले आहे.

दरम्यान आत्मा मालीक हॉस्पिटल आणि जवळके ग्रामपंचायत यांनी मोफत आयोजित केलेल्या या शिबिराला 61 महिला,38 पुरुष अशा एकूण 99 विविध रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती सरपंच सारिका थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जवळके गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम सुरू असून त्या अंतर्गत कोपरगाव पंचायत समिती यांचे मार्गदर्शनाखाली जवळके ग्रामपंचायत येथील हनुमान मंदिर,सभामंडप येथे सोमवार दि.०५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण व जवळके ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने “मोफत वैद्यकीय शिबिर” आयोजित केले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,जवळके विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष भास्कर थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,भास्कर थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,वाल्मीक भोसले,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,कानिफनाथ थोरात,अशोक शिंदे,जयराम वाकचौरे,नामदेव थोरात,सोसायटी सदस्य नवनाथ थोरात,गणेश थोरात,गोरक्षनाथ थोरात,परशराम थोरात,शांताराम थोरात,मच्छिंद्र थोरात,नानासाहेब थोरात,किशोर थोरात ग्रामपंचात अधिकारी परशराम हासे,श्रीहरी थोरात,संतू थोरात,दगडू थोरात,दशरथ सरवार आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात यांनी मानले आहे.जवळके ग्रामपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या उपक्रमाला जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आणि त्यांचे सहकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे सरपंच सारिका थोरात यांनी सांगितले आहे.
दरम्यान आत्मा मालीक हॉस्पिटल आणि जवळके ग्रामपंचायत यांनी मोफत आयोजित केलेल्या या शिबिराला 61 महिला,38 पुरुष अशा एकूण 99 रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती सरपंच सारिका थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.दरम्यान या संयुक्त “मोफत वैद्यकीय शिबिरात” महिला,पुरुष आदींची रक्त तपासणी,रक्तदाब तपासणी,सह अनेक उपचार करण्यात आले आहे.



