विशेष दिन
वार्तांकन करणारे वर्तमानपत्रे हा समाजाचा आरसा-डॉ.अजमेरे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समाजात घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन करणारे वर्तमानपत्रे हा समाजाचा आरसा असून त्यातून सामान्य माणसाच्या समस्या सुटण्यास मदत होत असून त्यांना वर्तमान काळासह आगामी काळात जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ.अमोल अजमेरे यांनी आपले प्रास्तविक करताना नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील एस.जी.शाळेचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी याने नुकत्याच संपन्न झालेल्या एका वर्तमानपत्राच्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम परीक्षेत यास एक लाख २१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्याचे सांगून त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे.यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.त्यांनी गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता.जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.त्या हा दिवस राज्यभर आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालय येथे तो संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे हे होते.

सदर प्रसंगी संस्थेचे सदस्य सचिन अजमेरे,राजेश ठोळे,आनंद ठोळे,डॉ.अमोल अजमेरे,सचिन अजमेरे,माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,मुख्याध्यापक रघुनाथ आर.लकारे,उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर,मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर आदी मान्यवरांसह बहूसंख्य पत्रकार उपस्थित होते.

त्यावेळीपुढे बोलताना ते म्हणाले की,”माध्यमांत काळाबरोबर झपाट्याने बदल होत आहे.मात्र दर्जेदार पत्रकारांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.कोपरगाव शहरातील वर्तमान पत्रात अनेक समस्यांना वाचा फोडून जनसामन्यांना न्याय दिला आहे.आगामी काळातही ते आपली भूमिका नक्कीच निभावतील असा असा आशावाद व्यक्त करून श्रीमान गोकुळचंद विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या जीवनाचे सोने केले आहे.मराठी माध्यमाच्या शाळा विद्यार्थ्यांना घडविण्यात कोठेही कमी पडत नाही त्यासाठी त्यांनी एस.जी.शाळेचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी याने नुकत्याच संपन्न झालेल्या एका वर्तमान पत्राच्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम परीक्षेत यास एक लाख २१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्याचे सांगून त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.त्यामुळे उगीच पालकांनी संभ्रमात राहू नये असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर कार्यक्रमात पत्रकार नानासाहेब जवरे,राजेंद्र सालकर,विजय कापसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक बलभीम उल्हारे यांनी मानले आहे.त्यावेळी उपस्थित पत्रकारांचा सरकार करण्यात आला आहे.



