जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या ठिकाणी संत दासगणु महाराज जयंती संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संतकवी ह.भ.प.दासगणु महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साई समाधी शताब्दी मंडप येथे श्री साईनाथ स्तवन मंजिरीचे सामूहिक पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.

संत दासगणू महाराज हे शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त,संतकवी आणि कीर्तनकार होते,ज्यांनी ‘संतकथामृत’,’भक्तिलीलामृत’,’भक्तिसारामृत’ यांसारख्या ग्रंथातून व कीर्तनातून साईबाबांचा आणि इतर संतांचा महिमा ओवीबद्ध रचनांद्वारे पसरवला होता.त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ म्हटले जाते.
संत दासगणू महाराज यांचा जन्म हा ६ जानेवारी १८६८ असून हे शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त,संतकवी आणि कीर्तनकार होते,ज्यांनी ‘संतकथामृत’, ‘भक्तिलीलामृत’, ‘भक्तिसारामृत’ यांसारख्या ग्रंथातून व कीर्तनातून साईबाबांचा आणि इतर संतांचा महिमा ओवीबद्ध रचनांद्वारे पसरवला; त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ म्हटले जाते आणि ते साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्षही होते.त्याची जयंती शिर्डी येथील साई संस्थानच्या वतीने मोठया उत्साहात संपन्न झाली आहे.

सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्री साईबाबा व संतकवी ह.भ.प.दासगणु महाराज यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले,अतुल वाघ यांच्यासह संस्थानचे सर्व विभागप्रमुख,कर्मचारी,ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



