जाहिरात-9423439946
अपघात

नायलॉन मांजा विक्रेत्या विरुद्ध कारवाई करा- मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    मकर संक्रांती काही दिवसांवर आली असताना नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा उच्छाद दिसून येऊ लागला आहे यात एक लहान मुलगा आणि दोन पुरुष असे तीन जण जखमी झाल्याची गंभीर घटना उजेडात आली आहे.त्यामुळे नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते विरेन बोरावके यांनी केली आहे.

  

“कोपरगावच्या नायलॉन मांजा विरुद्ध नागरिकांनीही जागरूक राहावे,तो खरेदी अथवा वापर करू नये तसेच कोठे बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी,नायलॉन मांजाऐवजी पर्यावरणपूरक व सुरक्षित कागदी किंवा सूती मांजाचा वापर करावा,जेणेकरून मानवासह पक्षी व प्राण्यांचेही संरक्षण होईल”-विरेन बोरावके,माजी गटनेते,कोपरगाव.

    कोपरगाव शहरात यापूर्वी नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक आणि निष्पाप पक्षी गंभीर जखमी झाले असून काही पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचा नाश होऊ नये,हीच खरी मानवता आहे.नायलॉन मांजा हा केवळ धोकादायकच नाही तर तो पक्षी, प्राणी आणि माणसांसाठीही जीवघेणा ठरत आहे.मात्र त्यावर अद्याप तरुण कोणताही बोध घेण्याची शक्यता दिसत नाही.अशीच घटना नुकतीच उघड झाली आहे.त्यामुळे याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी गटनेते बिरेन बोरावके यांनी एक प्रसिद्धी पत्रक माध्यमांना दिलं असून त्या विरोधात आवाज उठवला आहे.

विरेन बोरावके,माजी गटनेते,कोपरगाव नगरपरिषद.

   त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”नायलॉन मांजाची खरेदी व विक्री कायद्याने गुन्हा असतानाही कोपरगाव शहर व परिसरात सर्रासपणे नायलॉन मांजा विकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे.नायलॉन मांजा अतिशय धारदार व मजबूत असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार,पादचारी तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या आहेत.गळ्याला,हाताला किंवा चेहऱ्याला मांजा लागून गंभीर जखमा होण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून काही ठिकाणी जीवघेण्या घटना देखील घडल्याचे निदर्शनास आले आहे.नायलॉन मांजा वापरणे,साठवणे तसेच विक्री करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.तरीही काही विक्रेते नियम धाब्यावर बसवून नायलॉन मांजा विकत आहेत.याचा थेट फटका निष्पाप नागरिकांना बसत आहे.आपल्या आनंदामुळे कुणाचे घर उधवस्त होऊ नये,मकर संक्रांतीचा सण सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे.नागरिकांनी हि सामाजिक जाणीव ठेवत नायलॉन मांजाचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे. कोपरगाव नगरपरिषद,पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील दुकाने,फेरीवाल्यांची तपासणी करून मांजा आढळून आल्यास कारवाई करावी.

    कोपरगावच्या नागरिकांनीही जागरूक राहावे,नायलॉन मांजा खरेदी अथवा वापर करू नये तसेच कोठे बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी,नायलॉन मांजाऐवजी पर्यावरणपूरक व सुरक्षित कागदी किंवा सूती मांजाचा वापर करावा,जेणेकरून मानवासह पक्षी व प्राण्यांचेही संरक्षण होईल असे आवाहन विरेन बोरावके यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close