जाहिरात-9423439946
निवडणूक

नवनिर्वाचित पदाधिकारी,नगरसेवकांचा होणार सत्कार!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव नगरपरिषद नगरपरिषद निवडणुकीत माजी आ.कोल्हे गटाला अनेक वर्षांनी विजय मिळाला असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान व त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर नागरी सत्कार नव वर्षाच्या निमित्ताने साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आगामी गुरुवार दि.१ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत असून त्या निमित्ताने भजन संध्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नूतन अध्यक्ष पराग संधान यांनी आमच्या प्रतिंनिधीशी बोलताना दिली आहे.

भारतीय राजकारणात निवडणूक संपल्यावर सदर निवडून आलेला पदाधिकारी आणि विजेते सर्व पक्षीय उमेदवार हे एकाच कुटुंबाचे मानायची सर्वसाधारण पद्धत असून त्यानुसार अनेक पराभूतांनी विजेत्याचे अभिनंदन केलेले दिसले आहे.मात्र अलीकडील काळात याला दुर्दैवाने सुडाची किनार लाभताना दिसत आहे.अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

   या कार्यक्रमास सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आणि रेणुका कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सदरचा कार्यरत हा निवारा येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसर येथे सायंकाळी ६.वाजता सुरू होणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात नूतन नगराध्यक्ष,नगरसेवक,भाजप आणि मित्र पक्षाने पराभूत उमेदवार आदींचा नागरी सत्कार समारंभाने होणार असून,त्यानंतर राहुल खरे गौरव महाराष्ट्राचा विजेता यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कलविंदर दडियाल यांनी दिली आहे.

विजयी नगराध्यक्ष पराग संधान,पराभूत उमेदवार ओमप्रकाश कोयटे.

   या कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक तीन वमधील सर्व नागरिक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असल्याचा दावा केला आहे.यामध्ये निवारा,कोजागिरी,जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी,सुभद्रानगर,येवला रोड,आढाव वस्ती,विद्यानगर,रचना पार्क परिसरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग लाभणार आहे.या कार्यक्रमास कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे,असे आवाहन साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.

   दरम्यान भारतीय राजकारणात निवडणूक संपल्यावर सदर निवडून आलेला पदाधिकारी आणि विजेते सर्व पक्षीय उमेदवार हे एकाच कुटुंबाचे मानायची सर्वसाधारण पद्धत असून त्यानुसार अनेक पराभूतांनी विजेत्याचे अभिनंदन केलेले दिसले आहे.मात्र अलीकडील काळात याला दुर्दैवाने सुडाची किनार लाभताना दिसत आहे.यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close