पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या उद्योजकांकडून साई संस्थानला पाच कोटी देणगी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साईबाबांच्या शिर्डीत कायम अती महत्वाच्या व्यक्ती आणि राजकीय व्यक्ती,सिनेअभिनेते आणि अन्य व्यक्तींचा राबता असतो आज रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेऊन पाच कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.त्याबद्दल अनेक साईभक्तानी समाधान व्यक्त केले आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी धूपआरतीस उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.याप्रसंगी अनंत अंबानी यांनी श्री साईबाबा संस्थानकडे रुपये पाच कोटींची देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली आहे.त्यांच्या या दानशूरतेबद्दल साईभक्तानी समाधान व्यक्त केले आहे.



