क्रीडा विभाग
…हा संघ कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने दिमाखदार विजय मिळवून उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.दुसऱ्या गटातून हरियाणानेही उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.महाराष्ट्राचा संघ सूवर्णपदकाचा एक पाऊल जवळ पोहचला आहे.त्यामुळे बाद फेरीतील सामने आणखिनच रोमहर्षक होणार असल्याचे दिसत आहे.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक यांचेसह भोजन व्यवस्थेसाठी संदीप गायकवाड,नितीन शिंदे,निवास व्यवस्थेसाठी साईनाथ वर्पे,संजय नगरकर,मीरा पटेल,वैद्यकीय व्यवस्थेसाठी सुनील पोकळेआदी परिश्रम घेत आहेत.त्यांच्या नियोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व शालेय भारतीय खेल महासंघअंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजित शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रंगत भरली आहेत.स्पर्धेच्या चौथ्या दिवशी उपांत्यापूर्व आणि उपांत्य सामने रंगले.यात महाराष्ट्र संघाने बिहार संघाचा २४ गुणांनी रोमहर्षक विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.तर बिहार संघाने पहिल्या मध्यांतरात १५-१३ अशी २ गुणांची आघाडी आपल्याकडे ठेवली होती. मात्र,दुसऱ्या मध्यांतरात महाराष्ट्राने आघाडी घेत २९-३ गुणांच्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.या सामन्यातील विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या सई शिंदे आणि आरती खांडेकर यांनी स्पर्धेतील उत्कृष्ट पकडी आणि चढाई केल्या.त्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात मोलाची साथ दिली.बिहारकडून पहिल्या मध्यांतरात चांगल्या खेळाचे प्रदर्शन झाले,त्यांनाही प्रेक्षकांना साथ दिली आहे.त्यांच्याकडून छाया उमाटी,छोटी उमाटी आणि शिवानी उमाटी यांनी चांगला खेळ केला.दिलखुश हिनेही चांगल्या चढाया करून बोनस गुण मिळविले असल्याचे दिसून आले आहे.परंतु तिच्या संघाला विजय साकारता आला नाही.दुसरा उपांत्यपूर्व सामना हरियाणा विरुद्ध आसाम यांच्यात झाला.या सामन्यात हरियाणा संघाने ३९ गुणांनी जिंकला.पहिल्या मध्यांतरात हरियाणा संघाने सुरवातीपासून बढत आपल्या जवळ ठेवली होती.पहिल्या मध्यांतरात २६-९, तर दुसऱ्या मध्यांतरात ३७-१५ गुणांनी आघाडी घेत विजय मिळविला.हरियाणाकडून मुस्कान,कोमल,मनीषा यांनी चांगल्या पकडी करत संघाचा विजय साकारला.तर लायमा ब्रो, बिस्मात्री गजवान,दायमरी निक यांनी चांगल्या पकडी केल्या.

दरम्यान बाद फेरीत महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल सामन्यात पहिल्या मध्यांतरात २३-६, तर दुसऱ्या मध्यांतरात १९-१८ अशी ४२-२४ गुणांच्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.महाराष्ट्राकडून आरती खांडेकर,सई शिंदे व नगरची ज्ञानेश्वरी ढवन यांनी चांगला खेळ केला.या सामन्यात सई शिंदे आणि आरती खांडेकर यांनी अष्टपैलु खेळ करत प्रेक्षकांची वाहवाह मिळविली आहे.
बाद फेरीत पंजाब विरुद्ध दिल्ली यात झालेल्या सामन्यात ३७-३५ अशा अवघ्या २ गुणांनी दिल्लीला नमविले.पहिल्या मध्यांतरात १९-१६, तर दुसऱ्या मध्यांतरात दिल्ली संघाने १९-१८ अशी अघाडी घेतली आहे.मात्र, पंजाब संघाने पहिल्या मध्यांतरात ३ गुणांची आघाडी घेतल्याने त्यांना विजय साकारता आला.यात लक्ष्मी कौर हिने लक्षवेधी कामगिरी केली.मुस्कास,कनिका,खुशदीप कौर यांनी तिला चांगली साथ दिली.दिल्लीकडून सिया,मुस्कान,अंशु यांनी चांगल्या पकडी केल्या आहेत.परंतु त्यांना विजय साकारता आला नाही.राजस्थान विरुद्ध सीबीएसी यांच्यातील सामन्यात राजस्थान संघाने अवघ्या एका गुणाने हा सामना जिंकला.४३-४२ अशी गुणसंख्या राहिली.पहिल्या मध्यांतरात २४-१८, तर दुसऱ्या मध्यांतरात २४ -१९ अशी आघाडी घेतली होती.यात आयिना,रविना,कमला यांनी चांगल्या पकडी केल्या,तर सीबीएससीकडून रुबी,कनिका,ताहू यांनी चांगला खेळ केला.
दरम्यान बाद फेरीत महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल सामन्यात पहिल्या मध्यांतरात २३-६, तर दुसऱ्या मध्यांतरात १९-१८ अशी ४२-२४ गुणांच्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.महाराष्ट्राकडून आरती खांडेकर,सई शिंदे व नगरची ज्ञानेश्वरी ढवन यांनी चांगला खेळ केला.या सामन्यात सई शिंदे आणि आरती खांडेकर यांनी अष्टपैलु खेळ करत प्रेक्षकांची वाहवाह मिळविली आहे.पश्चिम बंगालकडून सनिहीता राज,तुनश्री हललकर,सकीना सलीम यांनी चांगला खेळ केला.उत्तर प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यात ३७-२७ गुणांच्या फरकाने उत्तर प्रदेश संघाने विजय मिळविला.पहिल्या मध्यांतरात १६-११, तर दुसऱ्या मध्यांतरात २१-१६ अशी आघाडी घेत सामना जिंकला.यात उत्तर प्रदेशकडून कोमल यादव,मोनिका चौधरी,नेहा देवी यांच्या चांगल्या पकडीने मध्य प्रदेश संघाला रोखून धरले.तर मध्य प्रदेश संघाकडून मघु,धनशिखा व आकांक्षा यांनी चांगला खेळ केला.हिमाचल विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात दिल्ली संघाने १२ गुणांनी हा सामना जिंकला.पहिल्या मध्यांतरात ९-९ अशी बरोबरी असताना दुसऱ्या मध्यांतरात मात्र २८ -१६ गुणांची आघाडी घेत हा सामना जिंकला.दिल्लीकडून अनुष्का,मुस्कान,मेघा यांनी दुसऱ्या मध्यांतरात चांगला खेळ केला. हरियाणा विरुद्ध केरळ यांच्यातील सामन्यात हरियाणा संघाने ३१ गुणांच्या फरकाने हा सामना एकहाती जिंकला. पहिल्या मध्यांतरात २१-११, दुसऱ्या मध्यांतरात २९-८ अशी आघाडी घेतली होती. हरियाणाकडून कोमल,मुस्कान, मनीषा यांनी चांगल्या पकडी केल्या. मध्य प्रदेश विरुद्ध उत्तरा खंड सामन्यात ३७-२७ गुणांच्या फरकाने उत्तरा खंड संघाने १० गुणांनी सामना जिंकला. पहिल्या मध्यांतरात १६-११, तर दुसऱ्यात २१-१६ गुणांची आघाडी घेत सामना जिंकला.
दरम्यान बिहार गोल्डन रेडवर विजयी बाद फेरीत झालेल्या बिहार विरुद्ध कनार्टक यांच्यातील सामन्यात बरोबरी झाल्याने हा सामना गोल्डन रेडवर खेळविण्यात आला.यात ३७-३७ अशी गुणांची बरोबरी झाली होती.पहिल्या मध्यांत १८-१३, तर दुसऱ्या मध्यांत २४-१९ अशी आघाडी घेतली होती,परंतु दोन्ही संघाचे गुण ३२-३२ अशी बरोबर झाल्याने दोन्ही संघांना पाच-पाच चढाईची संधी देण्यात आली.यातही दोन्ही संघांनी ३७-३७ अशी बरोबरी झाल्याने पंचांनी स्पर्धेच्या नियमानुसार गोल्ड रेडची संधी देण्यात आली.यात बिहार संघाने नाणे फेक जिंकत गोल्डन रेडमध्ये एक गुण मिळवत हा सामना जिंकला.यात बिहारकडून रानी उम्री,प्राची उम्री,द्रष्टी उम्री यांनी चांगला खेळ केला.कनार्टककडून देवानी,दीक्षा,रामया यांनी चांगला पकडी केल्याव आहेत.पंजाब विरुद्ध आंद्र प्रदेश पंजाब संघाने हा सामना २६ गुणांनी जिंकला.पहिल्या मध्यांतरात २२-९, तर दुसऱ्या मध्यांतरात २१-६ गुणांचा फरक राहिला.पंजाबकडून गुरजीत कौर,खुशदीप कौर,लक्षप्रीत कौर यांनी चांगल्या पकडी करून सामन्यात आघाडी मिळविली.आंध्रप्रदेशकडून एम. लिखीता,के.वसुंधरा,सी पल्लवी यांनी चांगला खेळ केला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक यांचेसह भोजन व्यवस्थेसाठी संदीप गायकवाड,नितीन शिंदे,निवास व्यवस्थेसाठी साईनाथ वर्पे,संजय नगरकर,मीरा पटेल,वैद्यकीय व्यवस्थेसाठी सुनील पोकळे,डॉ.मयूर शिंदे व टीम,साऊंड सिस्टिम व मंडप व्यवस्थेसाठी योगेश निळे,मैदान व्यवस्था माणिक जाधव,सांस्कृतिक विभाग आत्मदर्शन बागडे व टीम,सोशल मीडिया सागर अहिरे,सिव्हील,फॅब्रिकेशन,विद्युत विभाग चक्रधर सोनवणे व टिम,स्वच्छता व्यवस्था सुनील खरात व टीम,वाहन व्यवस्था विश्वास बारवकर व सर्व वाहन चालक,आयटी विभाग,फ्लेक्स बोर्ड व रांगोळी साठी कलाशिक्षक व सर्व व्यवस्थापक प्राचार्य व क्रीडा शिक्षक मेहनत घेत आहे.



