जलसंपदा विभाग
रब्बी पिकांना मागणी अर्ज भरा -…यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे.चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वाजे पर्यंत पाटबंधारे विभागाच्या सिंचन शाखा कार्यालयात जमा करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
“रब्बी पिके असलेल्या गहू,ज्वारी,मका,हरभरा आदी रब्बी पिके,फळबागा,बारमाही पिके आदी पिकांना लाभधारक क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालयात आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज जमा करावे”-आ.आशुतोष काळे, कोपरगाव.

वर्तमानात रब्बी पिकांची शेतकऱ्यांनी उभारणी केली आहे.त्यासाठी आता शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून रब्बी पिकांना पाणी देणे आवश्यक आहे.त्यानुसार पाटबंधारे विभागाला लाभधारक शेतकऱ्यांसाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करता येणार आहे.त्यासाठी गहू,ज्वारी,मका,हरभरा आदी रब्बी पिके,फळबागा,बारमाही पिके आदी पिकांना लाभधारक क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालयात आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज जमा करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
आपल्या रब्बी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज वेळेत दाखल करावेत जेणेकरून पाटबंधारे विभागाला लाभधारक शेतकऱ्यांसाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करता येणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.



