जाहिरात-9423439946
सहकार

…या साखर कारखान्यास पुरस्कार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला सहकार क्षेत्रातील लक्षवेधी कामगिरीबददल राज्याचे सहकारमंत्री ना.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे राज्यपातळीवरील ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्कारांने सन्माननीत करण्यांत आले असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.याबद्दल त्यांचे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आणि त्यांच्या संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

     

दरम्यान हा पुरस्कार संजीवनी कारखान्याचे कारखान्याचे संचालक रमेश आभाळे व ज्ञानेदव औताडे,व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी हा पुरस्कार स्विकारला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त पुणे येथील सहकार भवन येथे झालेल्या सहकार परिषदेत मंत्री बाबासाहेब देशमुख यांनी चळवळीसमोरील भविष्यातील आव्हाने, सहकार तत्वांचा प्रसार,व्यावसायिक प्रामाणिकता,पारदर्शकता,सामाजिक जबाबदारी तसेच शाश्वतविकास आदि विषयांवर मार्गदर्शन करत विकासमंथन केले त्यावेळी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर,साखर आयुक्त डॉ.संजय कोलते,सहकार आयुक्त दिपक तावरे,कॉसमॉस बँकचे अध्यक्ष मिलींद काळे,बँकेचे अध्यक्ष अॅड प्रल्हाद कोकरे,गौतम ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्यासह विविध सहकारी संस्था,साखर कारखान्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

     सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अलिकडेच देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांच्याहस्ते देशातील पहिल्या बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्मीती प्रकल्पाचे लोकार्पण करून सहकार क्षेत्रात कामगिरी करत लक्ष वेधून घेतले होते.संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली विविध रासायनिक उपपदार्थ निर्मीतीबरोबरच औषधनिर्माण क्षेत्रातही योगदान दिले आहे.
     
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close