निवडणूक
पदांसाठी शिवसेना बंडखोरांना पाठिंबा द्यायला तयार-आ.काळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीनंतर आगामी काळात शिवसेना बंडखोरांना जर आमची उपनगराध्यक्ष व विषय समित्यांसाठी गरज लागली तर पाचही वर्षे नक्की पाठिंबा देऊ अशी गुगली आज कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी टाकली असल्याने आता शिवसेना आणि अपक्ष उमेदवार काय भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजप कोल्हे गटाने बाजी मारली असून त्यांना १९ तर आ. आशुतोश काळे गटाने ११ जागा पटकवल्या आहे आणि शिवसेनेने चार आणि अपक्ष (कपबशी) यांनी एक जागा घेऊन आपले निर्णायक स्थान पटकावले असल्याने त्यांची वाटाघाटी करण्याची शक्ती (बार्गेनिंग) वाढली असल्याने आता ते भाजपकडे उपनगराध्यक्ष पदासह विषय समित्यांसाठी आग्रही राहण्याची शक्यता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आज आ.आशुतोष काळे यांनी थेट अमिष दाखवल्याने आता ही मंडळी काय करणार याकडे राजकीय निरीक्षणाचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगावात नगरपरिषदेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला असून त्यात भाजप कोल्हे गटाने बाजी मारली असून त्यांना १९ तर आ. आशुतोश काळे गटाने ११ जागा पटकवल्या आहे आणि शिवसेनेने चार आणि अपक्ष (कपबशी) यांनी एक जागा घेऊन आपले निर्णायक स्थान पटकावले असल्याने त्यांची वाटाघाटी करण्याची शक्ती (बार्गेनिंग) वाढली असल्याने आता ते भाजपकडे उपनगराध्यक्ष पदासह विषय समित्यांसाठी आग्रही राहण्याची शक्यता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आज न्यूजसेवा वेब पोर्टलची बातमी प्रसिद्ध झाल्यावर व त्याची तातडीने दखल भाजप कोल्हे गटाने घेतल्यानंतर आ.आशुतोष काळे आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी गटनेते वीरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,माजी नगरसेवक फकीर कुरेशी,धरमचंद बागरेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण आणलेला निधी आधी जाहीर करू मगच निधी देऊ त्याचा वापर योग्य होईल यासाठी आमचे नगरसेवक कार्यरत राहतील.सन -२०१६ नंतर ही निवडणूक झाली त्यामुळे विशेष महत्व होते.त्यावेळी आपले ०७ नगरसेवक निवडून आले होते.माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे निवडून आले होते.त्यांचे बहुमत होते म्हणून उपनगराध्यक्ष झाले होते.आता त्यात ५० टक्के वाढ झाली आहे.तीन उमेदवार पराभूत होते.नगराध्यक्ष उमेदवार अवघ्या थोड्या मतांनी पराभूत झाले आहे.सत्ताधारी गटाकडे १९ नगरसेवक आहे.त्यात शिवसेनेचे आहे.एक अपक्ष आहे.मागच्या वेळी विकासाच्या मुद्यावर वहाडणे यांना पाठिंबा दिला होता.आता त्यांना आवश्यक असेल तर आम्ही नक्की पाठिंबा देऊ असे आश्वासन दिले आहे.परिणामी सत्ता समतोल राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.
पूर्वी नागरिकांना झुलत ठेवण्याचे काम करत आहे.आमचा पाठिंबा घेतला तर ठीक नाही तर विरोधक म्हणून कार्यरत राहू.सन -२०१६ साली ०७ नगरसेवक असताना मला निवडून दिले होते.आता तर वाढ झाली आहे.नगरपरिषद आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी असते.
मागील कामाच्या बळावर ही मते मिळाली आहे.पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तयारी नक्कीच चांगली करू त्याबाबत नुकत्याच काही मुलाखती झाल्या आहेत.
सदर प्रसंगी ओमप्रकाश कोयटे म्हणाले की,”निवडणुकीतील पराभव हा पराभव असतो,कोल्हे गटाची चाळीस वर्षे पालिकेत सत्ता होती.आपण आ.आशुतोष काळे यांच्या कामात साथ देण्यासाठी उतरलो होतो,माझा प्रचार फक्त ४० दिवस झाला आणि त्यांची सत्ता सलग चाळीस वर्षे आहे.सत्तेत आलेल्या पक्षाने आणि जनतेने एक जाणीव ठेवली पाहिजे,एकूण मतदानात सत्ताधारी माजी आ.कोल्हे गटाला ४८ टक्के आहे.बाकी ५७ टक्के मते विरोधात म्हणजे आमच्या बरोबर आहे.बाकी अन्य पक्षांची मते त्यात आहे हे सांगण्यास ते विसरले नाही.इतर तालुक्यातील कमळ फुलले मात्र कोपरगाव शहरात मात्र ते गुंडगिरी मुळे त्यांना मते मिळाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कोल्हे कुटुंबाने तीन क्रमांकाच्या प्रभागात गुंडगिरी करत धनशक्तीचा वापर केली आहे.आपली आणि समता पतसंस्थेची जास्तीत जास्त बदनामी केली आहे.पत्रके वाटली नाही तर ती रस्त्यात फेकली आहे.कोल्हेंसारखा विकास कामात आपण खोडा घालणार नाही.त्यांनी चांगली कामे केली तर आपली व आ.काळे यांची त्यांना मदत राहील.
दरम्यान पुढे म्हणाले की,”समता नावाला लक्ष केले काही थकबाकीदारांना हाताशी धरून आपली बदनामी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.आम्ही थकबाकीरांवर कारवाई हि ठेवीदारांच्या हितासाठी करतो त्यामुळे ठेवी सुरक्षित राहतात.त्यासाठी आगामी काळात ते ठेवीदारांच्या हिताचे काम करू आणि करत राहू. ठेवीदारांना अभ्यद्य कवच आम्ही विम्याच्या माध्यमातून केले आहे.मात्र त्यांचे दुर्दैव असे की आजही ठेवी वाढत आहे.मला तीन ते चार वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.पण यावेळी गुंडगिरी आणि धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात करून आपला पराभव केला आहे.आ.आशुतोष काळे हे पाठीशी उभे राहिली आहे.त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा एकदा उभे राहू.माझ्यापेक्षा सत्ताधारी वर्गाला केवळ ०.९४ मते जास्त मिळाली आहे व मला पराभव झाला आहे.आगामी काळात समाजकारणाला राजकारणाची जोड देणार असल्याचे ओमप्रकाश कोयटे त्यांनी शेवटी जाहीर केले आहे.



