जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शहराला बंदिस्त पाइपलाइन करून देऊ-…या नेत्याचे आश्वासन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
    कोपरगाव शहराला आपण शुद्ध पाणी देण्यासाठी आपण नांदुर मधमेश्वर येथून बंदिस्त पाइपलाइन करून देऊ,कोपरगाव शहर धुळमुक्त करून देऊ,शहराला गोदावरी तीरावर संरक्षण भिंत बांधून देऊन,शहरात झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करू असे नगरविकास खात्याच्या वतीने आपण आश्वासन देत असून उद्या संपन्न होणाऱ्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे यांना मोठ्या मताधिक्याने मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

कोपरगाव येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत.

“राज्यातील नागरिकांना व रुग्णांना अडीच वर्षात आपण रुग्णांच्या उपचारासाठी ४५० कोटी दिले त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहे.त्यासाठी दोन उदाहरणे दिली.उपचारविना व शैक्षणिक फी वीणा कोणी आत्महत्या करणार असेल तर ते सरकार काय कामाचे”-एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.

   कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असताना त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे.डॉ.आंबेडकर मैदान आज गर्दीने खच्चून भरले असल्याचे आढळून आले आहे.आज त्यासाठी शेवटच्या दिवशी त्यांनी रणनीती आखून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करून शहरातील वातावरण ढवळून टाकले असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव येथील प्रचार सभेत उपस्थित जनसमुदाय दिसत आहे.

   सदर प्रसंगी शिर्डीचे माजी खा.सदाशिव लोखंडे,संगमनेरचे आ.अमोल खताळ,सेनेचे संपर्क प्रमुख संजीव भोर,जिल्हाप्रमुख नितीन औताडे,राहुल देशपांडे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल पुंडे,सेनेचे सचिव,सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे,माजी नगरसेवक संजय कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे सन -२००१ साली नगराध्यक्ष झाले त्यामुळे कोपरगाव शहराचा विकास झाला आहे.आता शहरातील नागरिकांचा वनवास संपवायचा असेल तर त्यांना निवडून द्यावे लागेल.त्यांना उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान करा.आमची सभा होऊ नये म्हणून अनेकांनी मनापासून प्रयत्न केले पण त्यांचे शहरातील नागरिकांनी व मतदारांनी कोणीच ऐकले नाही म्हणून आज एवढे मतदार आले आहे.झावरे यांनी केलेल्या कामाची आज पावती मिळाली आहे.झावरे हे जसे सामान्य कुटुंबातील आहे तसे आपणही सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे.सामान्य कार्यकर्ता असला की तो विकास करतो आपला अनुभव आहे.झावरे हे असेच सामान्य कार्यकर्ते आहे.झावरे यांनी जे कमावले त्याची पावती त्यांना उद्या मतदानातून मिळणार आहे.राजेंद्र झावरे हे बाळासाहेबांचे लढवय्ये कार्यकर्ते आहे.राज्यातील लाडक्या बहिणींना आपण जे दिले आहे.त्यातून तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.तुम्हाला दररोज पाणी हवे असेल तर तुम्हाला सेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे.आपण शहरातील झोपडपट्टी वासियाना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा उतारा दिला जाईल.विरोधकांनी निवडणूक पुढे ढकलण्याचे काम केले आहे.निवडणूक पुढे गेली तरी या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.”विरोधकांनी कितीही केली काव काव तरी विजयी होणार कोपरगाव” अशी चारोळी करून आपला विकास करणार आपण दिलेला शब्द नक्की खरा करून दाखविल्या शिवाय राहणार नाही.राज्यातील नागरिकांना व रुग्णांना अडीच वर्षात आपण रुग्णांच्या उपचारासाठी ४५० कोटी दिले त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहे.त्यासाठी दोन उदाहरणे दिली.उपचारविना व शैक्षणिक फी वीणा कोणी आत्महत्या करणार असेल तर ते सरकार काय कामाचे असा सवाल विचारला आहे.माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे २००१ साली अध्यक्ष झाले त्यामुळे विकास झाला आहे.त्यांना उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान करा असे आवाहन शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

   दरम्यान प्रास्ताविक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी केले तर उपस्थिताना जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,दिलीप सोनवणे,विमल पुंडे ,नीलेश दिवटे,राहुल देशपांडे,किरण खर्डे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर उपस्थितांचे आभार मकरंद जोशी यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close