वन व पर्यावरण
महिलेला मदत देण्याच्या आत बिबट्याचा पुन्हा हल्ला,एक जखमी!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील महिन्यात कोपरगाव तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली महिला शांताबाई अहिलाजी निकोले यांच्या वारसांना राज्य सरकारच्या वन विभागाच्या वतीने नुकतीच दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्याबाबत ग्रामस्थानी व महिलेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

येसगाव येथील रहिवासी व मयत महिला शांताबाई निकोले यांच्या वारसांना १० लाखाची मदत देण्यात आली असून या मदतीचा धनादेश नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत शांताबाई निकोले यांचा वारस मुलगा संतोष निकोले यांना देण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात बिबट्याने उच्छाद मांडला आहे.त्यात एक तीन वर्षीय बालिकेसह दोन जण मृत्युमुखी पडले होते तर एक महिला जखमी झाली होती.या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती.परिणामी विधानसभेत याबाबत मोठी चर्चा होऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीस पंचवीस तर जखमी झालेल्या नागरिकास राज्य सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली होती.कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात मागील महिन्यात दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा.सुमारास शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या अंदाजे ६० वर्षीय शांताबाई अहिलाजी निकोले यांचेवर गवतात लपून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले होते.

दरम्यान रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी आ.काळे यांच्या वस्तीवरील शेतमजुर रवींद्र मोरे यांचे वडील दामू नामदेव मोरे हे आपला मुलास सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मढी कडून माहेगाव देशमुख येथील आ.काळे यांच्या वस्तीवर असलेल्या आपल्या मुलास दुचाकी देण्यास जात असताना योगेश काळे यांच्या उसाच्या शेतातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला होता.सुदैवाने त्याच वेळी एक कार आली होती.त्यांनी सदर घटनास्थळी थांबून सदर बिबट्याला पिटाळून लावल्याने मोठा अनर्थ टळला आहे.मात्र दामू नामदेव मोरे यांना पायास व हातास सदर बिबट्याने चावा घेतला होता.त्यांनी कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदर घटनेची माहिती समजताच आ.आशुतोष काळे अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले होते तर त्यांनी त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली होती व मयत शांताबाई निकोले यांच्या वारसांना मदत मिळावी अशी मागणी केली होती.

दरम्यान पढेगाव येथे बिबट्याने दहशत निर्माण केली होती.त्याबाबत वन विभागाने कारवाई करत त्या बिबट्यास नुकतेच अण्णासाहेब कारभारी शिंदे यांचे वस्तीजवळून जेरबंद केले आहे.त्याचे हे छायाचित्र.
दरम्यान त्या मागणीची दखल घेऊन आ.काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून वन विभागाकडून शांताबाई निकोले यांच्या वारसांना १० लाखाची मदत देण्यात आली असून या मदतीचा धनादेश नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत शांताबाई निकोले यांचा वारस मुलगा संतोष निकोले यांना देण्यात आला आहे.याप्रसंगी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक राजेंद्र निकोले उपस्थित होते.



