जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पक्षप्रवेश !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला मोठे संघटनात्मक बळ मिळाले असून, प्रभाग क्रमांक १० मधील मुस्लिम बांधवांनी जाहीर पक्षप्रवेश करत भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे.संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

भाजप मध्ये प्रवेश केलेले कार्यकर्त्यांसमवेत विवेक कोल्हे दिसत आहेत.

 

“आम्ही विरोधकांकडे होतो तेव्हा फक्त गर्दी पुरते आम्हाला वापरले जात होतो.पण जेव्हा आमच्यावर वैद्यकीय संकट आले तेव्हा हात वर केले त्यावेळी आम्ही विवेक कोल्हे यांना संपर्क केला त्यांनी आमचा पक्ष पाहिला नाही थेट माणुसकी म्हणून मदत केली त्यामुळे कोल्हेसंह भाजप परिवार हा मतांसाठी राजकारण करणारा नाही”-अमीर पठाण,कोपरगाव.

  कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मोठ्या उत्साहात आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत असून त्यासाठी भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व मित्र पक्ष,लोकसेवा आघाडीने मागील सन-२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार नाही अशी स्थिती दिसून येत आहे.पहिल्या प्रचार टप्प्यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले होते.त्यासभेला त्यांनी मोठी गर्दी जमवली होती.त्यानंतर मात्र दि.२९ नोव्हेंबर रोजी न्यायिक कारणाने निवडणूक पुढे ढकलली होती.त्यानंतर सर्वच पक्ष थोडे ढिल्या अंगाने निवडणूक घेतील असे वाटत असताना अपक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून मुसंडी मारून कामाला गती दिली असल्याचे दिसून आले आहे.मात्र यात अपक्ष उमेदवारांची पुरती वाट लागली असल्याचे दिसून आले आहे.मात्र भाजप आणि मित्र पक्ष यांनी मोठी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे.अशावेळी मुस्लिम युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यांनी आगामी निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्यासोबत ताकतीने उभे राहून मोठा विजय निश्चित करणार असल्याचा दावा केला आहे.व आगामी मतदानात पराग संधान नगराध्यक्ष होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी अमीर पठाण म्हणाले की,”आम्ही विरोधकांकडे होतो तेव्हा फक्त गर्दी पुरते आम्हाला वापरले जात होतो.पण जेव्हा आमच्यावर वैद्यकीय संकट आले तेव्हा हात वर केले त्यावेळी आम्ही विवेक कोल्हे यांना संपर्क केला त्यांनी आमचा पक्ष पाहिला नाही थेट माणुसकी म्हणून मदत केली त्यामुळे कोल्हेसंह भाजप परिवार हा मतांसाठी राजकारण करणारा नाही, तर संकटाच्या वेळी माणूसकी जपणारा परिवार आहे.समाजाच्या अडचणी,दुःख आणि प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. त्यामुळेच आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

   या पक्षप्रवेशात सलीम पठाण,अमीर पठाण,विकी पठाण,अरबाज पठाण,परवेज शेख,सोहेल पठाण,इमरान शेख,अरबाज मणियार, साहिल पठाण,सोहेल शेख,समीर मणियार, रिहान शेख, सुरेश लहाने,शोएब शेख,निसार पठाण,अमीन पठाण,सुलतान शेख,सादिक शेख,जावेद शेख,सादिक सय्यद आदी मान्यवरांचा समावेश होता.

   या पक्षप्रवेशामुळे कोपरगाव मतदारसंघातील भाजपाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून,आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला निर्णायक यश मिळेल,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.याप्रसंगी उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close