निवडणूक
…या मंत्र्यांची सभा होणार कोपरगावात !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचत असून भाजपने (कोल्हे गट) पुर्ण शक्तिनिशी आपला सहभाग नोंदवला असून आज दुपारी 04 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा आयोजित केली असल्याची माहिती भाजप व मित्र पक्षांचे उमदेवार पराग संधान यांनी दिली आहे.या सभेस किती नागरिक आपली हजेरी लावतात यावर शहरातील मतदारांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आज भाजपने कोणतीही कसूर राहायला नको ची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.यासाठी आज थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित करून तशी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे मागील मुख्यमंत्री यांच्या प्रचार सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जो धक्का दिला होता त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक महसूलमंत्री बावनकुळे यांना बोलावले तर नाही ना अशी शंका उपस्थित होण्यास जागा निर्माण झाली आहे!
कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मोठ्या उत्साहात आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत असून त्यासाठी भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व मित्र पक्ष,लोकसेवा आघाडीने मागील सन-२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार नाही अशी स्थिती दिसून येत आहे.पहिल्या प्रचार टप्प्यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले होते.त्यासभेला त्यांनी मोठी गर्दी जमवली होती.त्यानंतर मात्र दि.२९ नोव्हेंबर रोजी न्यायिक कारणाने निवडणूक पुढे ढकलली होती.त्यानंतर सर्वच पक्ष थोडे ढिल्या अंगाने निवडणूक घेतील असे वाटत असताना अपक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून मुसंडी मारून कामाला गती दिली असल्याचे दिसून आले आहे.मात्र यात अपक्ष उमेदवारांची पुरती वाट लागली असल्याचे दिसून आले आहे.मात्र भाजप आणि मित्र पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.आज भाजपने कोणतीही कसूर राहायला नको ची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.यासाठी आज थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित करून तशी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे मागील मुख्यमंत्री यांच्या प्रचार सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जो धक्का दिला होता त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक महसूलमंत्री बावनकुळे यांना बोलवले तर नाही ना अशी शंका उपस्थित होण्यास जागा निर्माण झाली आहे असो ! या सभेत या निवडणुकीचे बरेच चित्र स्पष्ट होईल असे बोलले जात आहे.त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमदेवार ओमप्रकाश कोयटे यांचे प्रचारासाठी त्यासाठी मतदारांना करमणूक करण्यासाठी,”चला हवा येऊ द्या” ने उत्तर दिले आहे.त्यामुळे मतदारांत कोणाची हवा भरणार ? हे आगामी दोन दिवसांत दिसून येणार आहे.
दरम्यान या भाजपच्या प्रचार सभेसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदीं प्रमुख मान्यवरांसह कोपरगांव नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित राहणार आहेत.या सभेसाठी कोपरगाव शहरातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन शेवटी नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांनी शेवटी केले आहे.



