पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या मंदिरासाठी दिड कोटींचा निधी मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या तसेच कुंभारी व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाकडून पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय,राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या विकास कामे सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शिवभक्तांच्या सोयी सुविधेत वाढ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

कुंभारी येथील श्री राघवेश्वर महादेव देवस्थान हे कोपरगाव जवळ,गोदावरी नदीच्या काठावर असलेले एक प्राचीन,हेमाडपंथी शैलीतील,पुरातन शिवमंदिर आहे,जे साधारण १३ व्या शतकातील असावे असा अंदाज आहे,ज्यात अखंड शिळेमध्ये अप्रतिम कलाकुसर असून,मुख्य शिवलिंगावर फणाधारी नागाची प्रतिमा आहे आणि श्रावण व महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होते,तसेच नुकतेच या मंदिराच्या विकासासाठी १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला शिवभक्तांची मोठी गर्दी असते व वर्षभर शिवभक्त दर्शनासाठी येत असतात.भाविकांना याठिकाणी चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी श्री राघवेश्वर महादेव देवस्थानच्या विकासकामांसाठी निधी मिळावा याबाबत आ.काळे यांचा महायुती शासनाकडे पाठपुरावा सुरु होता.

दरम्यान त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय,राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत १.५० कोटीचा निधी मंजूर केला होता.जवळपास १०० वर्ष जुन्या असलेल्या या श्री राघवेश्वर महादेव देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी या देवस्थानाच्या विकासासाठी मिळवण्यात यश मिळाले आहे.त्यामुळे निश्चितपणे भविकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ होणार असून शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

या निधीतून मंदिराच्या चोहोबाजूने सरंक्षक भीत बांधणे,पेव्हर ब्लॉक बसविणे व मंदिर परिसर सुशोभिकरण होणार आहे.त्यामुळे देवालयाचा संपूर्ण परिसर अधिकच सुंदर होणार असून येणाऱ्या शिवभक्तांना त्याचा फायदा होणार आहे.श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाने १.५० कोटी निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे



