निवडणूक
कोपरगाव नगरीत पुन्हा वातावरण तापणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील बहुचर्चित नगरपरिषद निवडणूक म्हणून गणली गेलेली कोपरगाव नगरपरिषदेचे नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची न्यायिक प्रकियेमुळे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती.त्याचा प्रस्थापित काळे-कोल्हे गटाने बऱ्यापैकी लाभ उठवला असून यात अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार वाणी योगेश प्रभाकर,कुरेशी रहमून्नीसा राजमहमंद
आदी दोन जणांनी आपली तलवार म्यान केली असून आता केवळ पाच उमेदवार रिंगणार उरले आहे.त्यात भाजप कोल्हे गटाचे पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे,उबाठा सेनेचे उमेदवार सपना भरत मोरे आणि अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदी पाच जण रिंगणात राहिल्याने ही निवडणूक आता पंचरंगी ठरली असून आता ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा वातावरण तापणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आता कोपरगाव नगरपरिषदेच्या रिंगणात आता केवळ पाच उमेदवार रिंगणार उरले आहे.त्यात भाजप कोल्हे गटाचे पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे,उबाठा सेनेचे उमेदवार सपना भरत मोरे,आणि अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदी पाच जण रिंगणात राहिल्याने ही निवडणूक आता पंचरंगी ठरली आहे.
महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी संपल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप त्या सुरु आहेत.मात्र,नागपूर खंडपीठाने ज्या नगरपरिषदेत उमेदवारांना माघार येण्यास पुरेसा वेळ मिळाला नव्हता त्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचे आदेश दिला होता.त्यानुसार आज आपले नामनिर्देशनपत्र माघारीसाठी आज शेवटचा दिवस उरला असताना हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष,उमेदवार पुन्हा एकदा कामाला लागले असून या नगरपरिषदा मधील निवडणुकांचा शिमगा सुरू झाला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत.असून आज आपले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची नव्याने संधी निर्माण झाली होती.त्यात अध्यक्षपदाचे उमेदवार अपक्ष उमेदवार कुरेशी रहमून्नीसा राजमहमंद,वाणी योगेश प्रभाकर आदी दोन जणांनी आपली तलवार म्यान केली असून आता केवळ पाच उमेदवार रिंगणार उरले आहे.त्यात भाजप कोल्हे गटाचे पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयते,शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे, उबाठा सेनेचे उमेदवार सपना भरत मोरे,आणि अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदी पाच जण रिंगणात राहिल्याने ही निवडणूक आता पंचरंगी ठरली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या सिंहासनाला असलेला आगामी काळातील धोका ओळखून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र झावरे आदींच्या मागील सरदार,वतनदार,दरकदार आणि सैन्य काढून घेऊनही त्यांनी आपला स्वाभिमान दाखवून दिल्याने या स्वाभिमानी लढतीकडे कोपरगाव शहरातील मतदार कसे पाहतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान आता प्रभाग निहाय ज्या उमेदवारांनी मागे घेतले आहे त्यात प्रभाग क्र.4 ब मधून शिंदे अतिश सतिष,प्रभाग 8 ब मधून कुरेशी खलिक जमालभाई,प्रभाग क्रं.11ब मधून पठाण आसिफ मेहबूब,तर 12 ब मधून कुरेशी रेहमुन्निसा राज महमंद आदींनी आपली शस्त्रे म्यान केली आहे.त्यात बहुधा सत्ताधारी गटाच्या विशेष (!) विनंतीला यांनी मान दिला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे हवा निघून गेलेल्या या निवडणुकीत आता ऐन थंडीत किती वातावरण गरम होणार हे लवकरच उघड होणार आहे.

दरम्यान आज संपन्न झालेल्या माघारीत मूळ भाजपचे निष्ठावान सहकारी व नगराध्यक्षपदाची हळद लावणारे उमदेवार योगेश वाणी यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात चमत्कारिकरित्या माघार घेतली आहे.त्यामुळे त्यातून कोणाला फायदा होणार कोणाला तोटा होणार याचे राजकीय गणित शहराच्या राजकीय निरीक्षकांत सुरू झाले आहे.
दरम्यान आता निवडणूक पुन्हा एकदा होऊ घातली असल्याने बऱ्याच उमेदवारांना डबल हळद लागणार असून पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची हौस संपन्न होणार आहे. आता त्यांचे सोबत असणारे कलवरे,वाजंत्री,वऱ्हाडी,प्रचार साहित्य छापणारे आदींना बरकत येणार आहे.तर जाहीर सभा आणि प्रचारासाठी फिरणाऱ्यांना पुन्हा एकदा बिदागी मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान प्रभाग निहाय शिल्लक उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे…
(प्रभाग क्रं.1 अ)- मधून आढाव वैभव सुधाकर,(1 ब) मधून आवारे दादा रखमाजी,गवारे सचिन शरद.
(प्रभाग 02 अ)- मधून खरात राहुल उत्तम,निरभवने संदीप तुकाराम,पवार योगेश छबुलाल,शिरसाठ राहुल चंद्रहास,(प्रभाग 02 ब) मधून जपे स्वाती दिपक,पठाण न्याजोबी सरदार खाँ,पवार संगीता श्रीनिवास,शेख फमिदा हसम,साबळे स्मिता शैलेश.
(प्रभाग 03 अ) आढाव निर्मला सोमनाथ,दडियाल पल्लवी गुरुमितसिंग,(प्रभाग 03 ब) कदम जनार्दन सुधाकर,गरुड आदित्य रविंद्र,गायकवाड मयूर विजय,नरोडे सुधाकर बाबुराव.
(प्रभाग क्रं.04 अ )- उदावंत संजना संजय,गवळी रंजना रमेश,साळुंके मंदा पिराजी (प्रभाग क्र.04 ब) नरोडे हनुमंत पांडुरंग,मोरे भारत आसाराम,वाजे आकाश बबनराव,साळुंके सुनील आसाराम.
(प्रभाग क्र.5 अ) –आगलावे अमित चंद्रकांत,शिंदे संतोष माधव,(प्रभाग क्र.05 ब) – गलांडे अर्चना विनोद,घायतडकर शोभा अशोक,थोरात प्रियांका किरण,वाजे वैशाली विजय.
(प्रभाग क्रं.06 अ) –खैरनार सुनीता सुनील,फंड सारिका सुनील,बागुल पद्मावती योगेश,(प्रभाग क्रं.06 ब) डुंबरे संदीप रामदास,भुतडा मुकुंद रामेश्वर,शेख सलीम बेनेमिया शेवाळे संदीप मोतीराम,सातभाई विक्रमादित्य संजय.
(प्रभाग क्रं.07 अ) –आढाव प्रसाद बाळासाहेब,शिलेदार प्रतिभा सुनील,शारंगधर प्रसाद दिलीप,(प्रभाग क्रं.07 ब) -अजमेरे सोनल अमोल,कोपरे मोनिका प्रशांत,खरात काजल विशाल,पहाडे गौरी मंदार.
(प्रभाग क्रं.08 अ) –चंदनशिव अनिता सुरेश,जाधव अर्चना सुखदेव,त्रिभुवन सुनंदा माधव,पगारे मनिषा दत्तू,मरसाळे विमल भगवान,शिंगाडे वर्षा प्रफुल,शिंदे वैशाली शुभम,(प्रभाग क्रं.08 ब) अत्तार इम्तियाज रफिक,काळे किशोर बाबुराव,कुरेशी आरिफ करीम,पठाण हैदर हमीद,मोरे अर्जुन रघुनाथ.
(प्रभाग क्रं.09 अ)-आहेर सागर निंबा,खरात सिद्धेश शरद,खंडिझोड राजेंद्र जयदेव,पवार मधुकर विश्राम,रणशूर जितेंद्र चंद्रकांत,(प्रभाग क्रं.09 ब) –आढाव लक्ष्मीबाई माधव,देवकर विजया संदीप,धोत्रे भाग्यश्री चंद्रकांत, फडे अंजना गंगाधर,भगत बीना विजय,शेख समा अयुब.
(प्रभाग क्रं.10 अ) –कथले रवींद्र दत्तात्रय,गलांडे तुषार दादासाहेब,(प्रभाग क्रं.10 ब) भसाले श्रेया श्रीपाद,वाकचौरे माधवी राजेंद्र.
(प्रभाग क्रं.11 अ) आरणे स्वाती संतोष,कांबळे अंजना संजू,त्रिभुवन सोनम अरुण,भालेराव संगीता गुलाब,म्हस्के उषा सोमनाथ,(प्रभाग क्रं.11 ब) उशीर योगेश वसंत,कडू प्रशांत बाळासाहेब,काळे शुभम कैलास,लोखंडे राजेंद्र श्रावण,शिंदे योगेश छबुराव,सैय्यद शरफुद्दीन शमसुद्दीन.
(प्रभाग क्र.12 अ) आंग्रे विजया मिनानाथ,चव्हाण जयश्री कैलास,मंजुळ सविता कैलास,शिंपी भारती शामकांत,शेख सुमैय्या इरफान,(प्रभाग क्रं.12ब) – जाधव अक्षय गणेश,मोरे योगेश बन्सीलाल,वाघ सनी रमेश,सैय्यद हाजी मेहमूद मनवरभाई.
(प्रभाग क्रं 13 अ) –खांडेकर शिवाजी आनंदा,पिंजारी जाफर शफी,पांडोरे आकाश भास्कर,मंजुळ स्वप्नील दिलीप,(प्रभाग 13 ब) –पठाण जुलेखा मेहबूब,पठाण निलोफर फिरोजखान, बेलदार प्रतिभा सुरेंद्र,शेख हिणकौसर मुक्तार.
(प्रभाग क्रं.14 अ) – गंगूले शंकर वसंतराव,पाठक अविनाश कैलास, बागवान इकबाल गणी, लहिरे वाल्मीक जयसिंग,(प्रभाग क्रं.14ब)- बागवान यास्मिन गणी,राठोड परिगाबाई सुनील,लांडगे सविता अशोक,शिंदे माधुरी मच्छिंद्र,सोनवणे विद्या राजेंद्र.
(प्रभाग क्रमांक 15 अ) –कानडे स्वप्नाली वैभव,राक्षे सुरेखा विनोद,साबळे वंदना लक्ष्मण,(प्रभाग क्रं.15ब) -आव्हाड अनिल विनायक,चव्हाण वैभव बाबासाहेब,नाईकवाडे विनोद साहेबराव,लकारे साहिल रामचंद्र,हाडा गगन अनिल आदींचा समावेश आहे.



