जाहिरात-9423439946
आंदोलन

बाबा पीर रतनाथ घटनेचा कोपरगावात निषेध!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगावात शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतननाथ मंदिरांची तोडफोड केली.त्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून दिल्ली महानगरपालिकेच्या अन्यायकारक कृत्याचा निषेध करून शीख समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या आंदोलनात आ.काळे सहभागी झाले समवेत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे व पंजाबी हिंदू व शीख बांधव.

  

“दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतननाथ मंदिरांची केलेली तोडफोड अतिशय दुर्दैवी घटना आहे.त्यामुळे निश्चितपणे पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.त्याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना लेखी पत्र पाठवून त्या पत्रात आपल्या भावना कळवणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   नवी दिल्ली शहरातील झंडेवालान परिसरात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तोडक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांमध्ये आक्रोश पसरला आहे.बाबा पीर रतन नाथ या प्राचीन मंदिर परिसरात बुलडोझर चालवून लंगर हॉल,बाग आणि जवळपास १०० हून अधिक घरे तोडण्यात आली.हा संपूर्ण परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंज मुख्यालयाच्या शेजारी आहे.त्यामुळेच इथल्या लोकांमध्ये संताप दिसून येत आहे.त्याचे पडसाद आज कोपरगाव शहरातील शीख समुदायात दिसून आले असून त्यांनी आज मोर्चा काढून तहसील कार्यालयात त्याचा निषेध नोंदवला आहे.त्यावेळी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी सहभाग नोंदवला आहे.त्यातली हे आश्वासन दिले आहे.

  सदर घटनेचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शहरातील पंजाबी हिंदू व शीख बांधवांनी एकत्र येवून प्रभू श्री रामांचे दर्शन घेऊन श्रीराम मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला.कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांना निवेदन देवून धार्मिक स्थळ तोडफोड विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.यावेळी आ.काळे यांच्यासमवेत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.

त्यावेळी आ.काळे म्हणाले की,”दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतननाथ मंदिरांची केलेली तोडफोड अतिशय दुर्दैवी घटना आहे.त्यामुळे निश्चितपणे पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.त्याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना लेखी पत्र पाठवून त्या पत्रात पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे नमूद करून त्यांच्या भावनांचा आदर करून दिल्लीच्या त्या जमिनीबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.या बाबत तुमच्या सोबत असून मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांच्या भावना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवणार आहे.आपल्याला कधीही गरज भासल्यास आपण सदैव सोबत आहे.तुम्हाला जिथे आपली गरज भासेल तिथे स्वतः तुम्हा सर्वांसोबत ठामपणे उभा राहीन असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.

पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या आंदोलनात आ.काळे सहभागी झाले समवेत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे व पंजाबी हिंदू व शीख बांधव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close