निवडणूक
….या नेत्यांची यांची जाहीर माफी मागा-गंगवाल यांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे व माजी खा.शंकरराव काळे या दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत असे म्हणण्याचा अथवा आरोप करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, असे सांगत या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संदीप कोयटे यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी मनसेतून भाजपमय झालेले कार्यकर्ते संतोष गंगवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

दरम्यान या घटनेत विशेष हे म्हटले पाहिजे की,ज्या वेळी संदीप कोयटे यांनी हा आरोप केला त्यावेळी विद्यमान आ.आशुतोष काळे हे व्यास पिठावर उपस्थित होते.त्यांनी या प्रकरणी ‘ च’कार शब्द काढलेला नाही.मात्र या प्रकरणी कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी भलतेच मनाला लावून घेतले असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष,नेते आणि कार्यकर्ते यांना झटका देणारा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असून त्यात त्यांनी 03 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी 21 डिसांबर पर्यंत पुढे ढकलली आहे.महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी संपल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप त्या सुरु आहेत.मात्र,नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिला आहे.आता आपले नामनिर्देशनपत्र माघारीसाठी अवघे दोन दिवस उरले असताना हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष,उमेदवार पुन्हा एकदा कामाला लागले असून या नगरपरिषदा मधील निवडणुकांचा शिमगा सुरू झाला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत.त्यात कोयटे यांच्या कॉर्नर सभेतील संदीप कोयटे यांच्या आरोपाला म्हणजेच पहिल्या कढीला कोल्हे भाजपने ऊत आणला असल्याचे दिसून येत आहे.त्यात पहिल्या पत्रकार परिषदेत मनसेतून भाजपवासी झालेले कार्यर्कते संतोष गंगवाल यांनी हा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”जर आपण किंवा आपले पिताश्री विविध गुन्ह्यांमध्ये बरबटलेले आहात तर आपल्याला कुठला अधिकार आहे की आपण स्व.शंकरराव कोल्हे व शंकरराव काळे या दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही असे प्रतिपादन करत या घटनेतील दोन्ही व्यक्तिमत्व कोपरगाव तालुक्याचे प्रमुख दोन नेते होते,कधीकाळी आरोप करणारे संदीप कोयटे यांचे पिताश्री हे त्यांचे कार्यकर्ते होते.आज दोघांपैकी एकाच्या अधिपत्याखालील निवडणूक लढवत आहात.स्व. काळे असतील किंवा कोल्हे असतील या दोन्ही नेत्यांवर केसेस दाखल असल्याचे वक्तव्य करून तुम्ही त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे.या दोन्ही दिवंगत नेत्यांवर खटले दाखल झाले होते मात्र त्यांच्यावर कुणाचीही फसवणूक झाल्याचा आरोप नव्हता.आज कोयटे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.336 जीवन व सुरक्षेला धोका,340 चुकीची बंदिस्ती,406 मालमत्ता/पैशाचा गैरवापर,408 विश्वासाचा गैरवापर,409 आर्थिक गैरव्यवहार,417 ठगवणे,418 जाणीवपूर्वक फसवणूक तसेच 420 फसवणूक,467 मौल्यवान सुरक्षा,मृत्युपत्र किंवा इतर कोणतेही अधिकार संबंधित बनावट दस्तावेज तयार करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद कोयटे यांच्यावर दाखल आहे.संदीप कोयटे यांच्यावर देखील कॅनरा बँकेमध्ये 141 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची नोटीस आहे.याबद्दल सीबीआयने देखील गुन्हा दाखल केलेला आहे.आणि त्यांच्या पिताश्री कोयटे यांच्यावर तब्बल 13 खटले दाखल आहेत,ज्यापैकी सहा निकाली निघालेल्या आहेत आणि सात तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत.त्यापैकी दोन खटल्यात ओमप्रकाश कोयटे हे फरार असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे आम्ही आपणास आवाहन करत आहे की,दिवंगत कोल्हे व काळे यांच्या कार्यकर्त्यांची आपण माफी मागावी, असे आवाहन संतोष गंगवाल यांनी शेवटी केले आहे.
दरम्यान या घटनेत विशेष हे म्हटले पाहिजे की,ज्या वेळी संदीप कोयटे यांनी हा आरोप केला त्यावेळी विद्यमान आ.आशुतोष काळे हे व्यास पिठावर उपस्थित होते.त्यांनी या प्रकरणी चकार शब्द काढलेला नाही.मात्र या प्रकरणी कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी भलतेच मनाला लावून घेतले असल्याचे दिसून येत आहे.त्याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.



