निवडणूक
…या शहरात मतदार जागृती अभियान संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात मतदान जनजागृती रॅलीचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते.यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढली.मतदान जनजागृती करणारे विविध फलक हातात घेऊन घोषणा देत विद्यार्थी उत्साहाने शहरातून चालत होते.दरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील मतदारांना ‘मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो’,’जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद’ आदी घोषणांनी जागे केले आहे.

निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र जारी केलेले असताना बऱ्याच वेळा गैरप्रकार होताना दिसतात.आजच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणांना आळा गाठला जाऊ शकतो त्यासाठी मतदार जागृती गरजेची असल्याचे दिसून येत आहे.
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले.’जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे.योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक आणि विना मोबदला मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे.यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत कार्यक्रम राबविला जातो.तसेच नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात.निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे.विशेषतः निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे.या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते.म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे.निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा.योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते.वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करावयास हवे.नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती त्यांना उपलब्ध करून दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल.निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी होऊन मतदारयादीत नाव समाविष्ट होऊ शकेल.निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते.तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती मिळू शकते.निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र जारी केलेले असताना बऱ्याच वेळा गैरप्रकार होताना दिसतात.आजच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणांना आळा गाठला जाऊ शकतो त्यासाठी मतदार जागृती गरजेची असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने हा उपक्रम राबवला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान रोहमारे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून या जेरीस प्रारंभ झाला होता.यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. ठाणगे यांनी महाविद्यालयाची यामागील भूमिका सांगितली व महाविद्यालयाची लोकशाही व संविधानिक मूल्यांप्रती असणारी बांधिलकी विशद केली.
दरम्यान शहरातील तहसील कार्यालय व पंचायत समिती परिसरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर केले.तसेच सदर पथनाट्य विद्यार्थ्यांनी शहरात विविध ठिकाणी सादर केले.त्यास नागरिकांचा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती आहे.सदर फेरीसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते.



