अभिष्टचिंतन कार्यक्रम

या नेत्याचा वाढदिवस उत्साहात साजरा !

न्यूजसेवा

संवत्सर- (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व नामदेवराव पा.परजणे गोदावरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा ५६ वा वाढदिवस संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे आणि अन्य मान्यवर दिसत आहे.

राजेश परजणे आणि गोदावरी दूध संघ आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.तालुक्यात अनेक कार्यकर्ते जोडले आहे.स्व.नामदेवराव परजणे यांच्या पश्चात त्यांनी त्यांचा समर्थपणे वारसा चालवला आहे.काळे कोल्हेंच्या साम्राज्यात त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे एवढी सोपी गोष्ट नव्हे.मात्र गेली २१ वर्षे त्यांनी आपले शिवधनुष्य पेलले असल्याचे दिसून येत आहे.

    जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे आणि गोदावरी दूध संघ आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.तालुक्यात अनेक कार्यकर्ते जोडले आहे.स्व.नामदेवराव परजणे यांच्या पश्चात त्यांनी त्यांचा समर्थपणे वारसा चालवला आहे.काळे कोल्हेंच्या साम्राज्यात त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे एवढी सोपी गोष्ट नव्हे.मात्र गेली २१ वर्षे त्यांनी आपले शिवधनुष्य पेलले असल्याचे दिसून येत आहे.त्यांचा आज ५६ वा वाढदिवस.तो पंचायत समितीचा शिक्षण,बालकल्याण,कृषी विभाग आदींच्या वतीने नाना नानी पार्क या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना राजेश परजणे.

    सदर प्रसंगी संवत्सर गावच्या सरपंच सुलोचना दिलीपराव ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब साबळे,कृषी अधिकारी पंडित वाघेरे,कनिष्ठ अभियंता राजेंद्र दिघे,सी.डी.लाटे,यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी लहान मुलांच्या समवेत वृक्षारोपण करून नामदेवराव परजणे महाविद्यालय या ठिकाणी उपस्थिताना शुभेच्छा दिल्या आहेत.

   याप्रसंगी राजेश परजणे यांनी आपल्या मनोगतात नामदेवराव परजणे यांचा उल्लेख करून गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करावी ही त्यांचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचं काम जिल्हा परिषद शाळा पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक व राज्यांमध्ये तृतीय क्रमांक येऊन गोरगरिबाचे विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.त्याच प्रमाणात पूर्व भागातील मुला मुलींसाठी महाविद्यालयाची सोय व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करून आज ही महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि त्या मुलांना नोकरी व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे लागलेला असल्याचे सांगितले आहे.गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी नातीगोती हे पुस्तक भेट दिले आहे.
 
   याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुलांना बाळासाहेब सहाने यांच्यावतीने गणवेश वाटप देण्यात आले.तर पंडित वाघेरे,बाळासाहेब साबळे,दिलीप ढेपले,श्रीमती शबाना शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

   सदर प्रसंगी चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मणराव साबळे,दिलीप ढेपले,लक्ष्मण परजणे,खंडू फेपाळे,शिवाजी गायकवाड,सोमनाथ निरगुडे,पोपट करपे,भरत बोरणारे,बाळासाहेब दहे, दिलीप तिरमके,अनिल आचारी,ज्ञानदेव कासार,संभाजी भोसले,अविनाश गायकवाड,बाळासाहेब भोसले,सतीश काळे,संदीप भाकरे,रवी भाकरे,चंद्रकांत साबळे,अर्जुन तांबे पत्रकार श्रीटिके आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close